मराठी बातम्या /बातम्या /real-estate /

Special Story : पंतप्रधान आवास योजनेची ही वैशिष्ट्ये आणि लाभ जाणून घ्या

Special Story : पंतप्रधान आवास योजनेची ही वैशिष्ट्ये आणि लाभ जाणून घ्या

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या (Pradhan Mantri Awas Yojana) माध्यमातून आता तुमचं स्वतःच्या घराचं स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकतं. सर्वांसाठी घर या उद्देशाने केंद्र सरकार प्रधानमंत्री आवास योजना राबवत आहे. 2022 पर्यंत `सर्वांसाठी घर` हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे.

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या (Pradhan Mantri Awas Yojana) माध्यमातून आता तुमचं स्वतःच्या घराचं स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकतं. सर्वांसाठी घर या उद्देशाने केंद्र सरकार प्रधानमंत्री आवास योजना राबवत आहे. 2022 पर्यंत `सर्वांसाठी घर` हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे.

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या (Pradhan Mantri Awas Yojana) माध्यमातून आता तुमचं स्वतःच्या घराचं स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकतं. सर्वांसाठी घर या उद्देशाने केंद्र सरकार प्रधानमंत्री आवास योजना राबवत आहे. 2022 पर्यंत `सर्वांसाठी घर` हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर : प्रत्येकाच्या जीवनात काही स्वप्नं असतात. ही स्वप्नं पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण परिश्रम घेत असतो. या परिश्रमांना आर्थिक नियोजनाचीही जोड दिली जात असते. स्वतःचं घर हे त्यापैकीच एक स्वप्न. हे स्वप्न आपल्यापैकी बहुतांश जण पाहतात. परंतु, आर्थिक नियोजन, आर्थिक परिस्थिती आणि घरांच्या किमती बघता हे स्वप्न प्रत्यक्षात उतरतं असं नाही. आज शहरी भागात घराच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. गृह खरेदी ही सर्वसामान्य किंवा आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गाच्या आवाक्याबाहेर गेली आहे. एका बाजूला ही गोष्ट खरी असली तरी दुसऱ्या बाजूला गृह खरेदीला (Home Buying) प्रोत्साहन मिळावं म्हणून सरकार मदतीचा हात देत आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या (Pradhan Mantri Awas Yojana) माध्यमातून आता तुमचं स्वतःच्या घराचं स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकतं. सर्वांसाठी घर या उद्देशाने केंद्र सरकार प्रधानमंत्री आवास योजना राबवत आहे. 2022 पर्यंत `सर्वांसाठी घर` हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे. या योजनेची वैशिष्ट्यं आणि योजनेचा लाभ कोणाला मिळू शकतो याविषयी सविस्तर जाणून घेऊ या... प्रधानमंत्री आवास योजना 15 जून 2015 रोजी सुरू करण्यात आली. 2022 पर्यंत गरजू घटकांना या योजनेतून घरकुलाचा लाभ दिला जाणार आहे. या योजनेतून 20 वर्षं कालावधीकरिता घरकुलासाठी 6.50 टक्के दरानं अनुदान व्याज दिलं जाणार आहे. एलआयजी (LIG) आणि ईडब्ल्यूएस (EWS) या श्रेणीतल्या लाभार्थ्यांसाठी पीएमएवाय क्लास (PMAY CLSS) योजनेचा लाभ घेण्यासाठीची अंतिम मुदत 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. पीएमएवाय योजनेची वैशिष्ट्यं : - पीएमएवाय योजनेतून देशाच्या शहरी भागात सुमारे 2 कोटी परवडणारी घरं उभारण्यात येणार आहेत. यात महाराष्ट्र, तमिळनाडू आणि पश्चिम बंगालसह अन्य राज्यांचा समावेश आहे. - क्रेडिट लिंक्ड सबसिडी योजना (CLSS) हे या योजनेचं सर्वांत प्रमुख वैशिष्ट्य म्हणता येईल. या अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतल्या व्यक्ती अनुदानित व्याज दरावर गृहकर्जाची निवड करू शकतात. - मोठी सबसिडी (Subsidy) हे योजनेचं अजून एक वैशिष्ट्य म्हणता येईल. - सध्याच्या काळात सर्वसामान्य नागरिकांसाठी गृहकर्जासाठी व्याज दर (Interest Rate) हा सुमारे 10 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहे; मात्र या योजनेअंर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना 6.50 टक्के दरानं 20 वर्षं कालावधीकरिता गृह कर्ज (Home Loan) मिळतं. हे वाचा - Weight Loss Simple Steps: New Year Party साठी वजन कमी करायचंय? फॉलो करा या तीन सोप्या स्टेप्स - केंद्र सरकार या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) आणि अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) 1 लाख ते 2 लाख 30 हजार रुपयांपर्यंत अनुदान देतं. - ईडब्ल्यूएस आणि एलआयजी श्रेणीतल्या व्यक्ती 6 लाख रुपयांपर्यंत गृह कर्जासाठी अर्ज करू शकतात. त्यांना 6.50 टक्के व्याज दरानं 20 वर्षांकरिता कर्ज मिळू शकतं. - मध्यम उत्पन्न गट 1 मधले लाभार्थी 9 लाख रुपयांपर्यंतच्या गृह कर्जासाठी अर्ज करू शकतात. त्यांना 20 वर्षांच्या कालावधीकरिता 4 टक्क्यांपर्यंत गृहकर्ज व्याजदर सबसिडी मिळू शकते. - तुम्ही मध्यम उत्पन्न गट 2 मधले लाभार्थी असाल, तर 12 लाखांपर्यंत 20 वर्षांच्या कालावधीकरिता 3 टक्के गृहकर्ज व्याज दर सबसिडी मिळू शकते. - घरकुल बांधण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा (Technology) वापर हे या योजनेचं वेगळेपण म्हणता येईल. या योजनेअंर्गत घरांची बांधणी पर्यावरणपूरक (Eco-friendly) आणि शाश्वत तंत्रज्ञानाचा वापर करून केली जाणार आहे. - या योजनेत देशातल्या सर्व शहरांचा समावेश करण्यात आला असून, यात 4041 शहरे समाविष्ट आहेत. तसंच 500 क्लास वन शहरांचाही यात समावेश असून, तीन टप्प्यांत ही योजना पूर्ण केली जाईल. - प्रधानमंत्री आवास योजनेची क्रेडिट लिंक्ड सबसिडी प्रक्रिया सर्व वैधानिक शहरांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यापासूनच लागू करण्यात आली आहे. - या योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन (Online) पद्धतीनं अर्ज दाखल करता येणार आहे. तसंच अर्जावर काय कार्यवाही सुरू आहे, याची वेळीवेळी माहिती संबंधित लाभार्थ्याला ऑनलाइन जाणून घेता येणार आहे. हे वाचा - Redmi Note 11T भारतातील सर्वात पॉवरफुल 5G फोन, 50MP कॅमेरासह मिळतील जबरदस्त फीचर्स पीएमएवाय योजनेचे लाभार्थी - मध्यम उत्पन्न गट 1 (MIG - 1) : समाजातल्या ज्या घटकांचं वार्षिक उत्पन्न 6 लाख ते 12 लाखांदरम्यान आहे, अशा घटकांचा या उत्पन्न गटात समावेश करण्यात आला आहे. - मध्यम उत्पन्न गट 2 (MIG - 2) : समाजातील ज्या घटकांचं वार्षिक उत्पन्न 12 लाख ते 18 लाखांदरम्यान आहे, असे घटक या गटात समाविष्ट असतील. - अल्प उत्पन्न गट (LIG) : समाजातल्या ज्या घटकांचं वार्षिक उत्पन्न 3 लाख ते 6 लाखांदरम्यान आहे, अशा घटकांचा या गटात समावेश असेल. - आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट (EWS) : समाजातल्या ज्या घटकांचं वार्षिक उत्पन्न 3 लाखांपर्यंत आहे, असे घटक या गटात असतील. - पीएमएवाय योजनेत ईडब्ल्यूएस श्रेणीतील लाभार्थी संपूर्ण मदतीसाठी पात्र असतील, तर एमआयजी 1 आणि 2 श्रेणीतले लाभार्थी केवळ क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीमसाठी पात्र असतील. हे वाचा - सर्वजण लसवंत होईपर्यंत कोणीही सुरक्षित नाही, Gavi च्या प्रमुखांनी गरीब देशांमधील लसीकरणाबाबत व्यक्त केली चिंता - एलआयजी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील लाभार्थ्यांना योजनेसाठी अर्ज करताना प्राधिकरणाकडे उत्पन्नाचा पुरावा म्हणून प्रतिज्ञापत्र सादर करावं लागेल. - पीएमएवाय योजनेत पुरुषांप्रमाणेच महिलांनाही (Women) प्राधान्य देण्यात आलं आहे. यात नोकरदार महिला, तसंच विधवा, अल्पसंख्याक, ट्रान्सजेंडर, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग नागरिकांसारख्या अन्य गटांसाठीदेखील तरतुदी करण्यात आल्या आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Central government, Pradhan mantri awas yojana

    पुढील बातम्या