जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / Online Rummy : ऑनलाइन रमीमध्ये गमावले 20 हजार, नैराश्यात तरुणाने संपवलं जीवन

Online Rummy : ऑनलाइन रमीमध्ये गमावले 20 हजार, नैराश्यात तरुणाने संपवलं जीवन

गणेश काळदंते

गणेश काळदंते

पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 10 जुलै : सध्या सोशल मीडियाचे युग आहे आणि सोशल मीडियावर विविध प्रकारच्या खेळाच्या जाहिरातींच्या माध्यमातून तरुणाईला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रकार सुरू आहे. याला अनेक जण बळी पडतात. अशीच एक धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातून समोर आली आहे. ऑनलाइन रमीमध्ये एक तरुण 20 हजार हरला म्हणून त्याने गळफास घेऊन जीवन संपविले. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण घटना - आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल फोन आणि इंटरनेटचा बोलबाला सुरू आहे. अशा परिस्थितीत पारंपरिक खेळांपासून दूर राहून लहान मुले आणि तरुण मोबाइल आणि लॅपटॉपमधील ऑनलाइन गेमिंगमध्ये आपली आवड दाखवत आहेत. पूर्वी मुले मैदानात क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, खेळताना दिसायची. पण आता इंटरनेटच्या जमान्यात तरुण मुले ऑनलाइन गेम खेळण्यात व्यस्त आहेत. याचा वाईट परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होत असल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबतची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडेमध्ये ऑनलाइन रमीमध्ये 20 हजार रुपये हरल्याने एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गणेश काळदंते, असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. गणेश हा कॅबचालक होता. तो स्वतःची गाडी चालवायचा. परंतु, या व्यतिरिक्त त्याला ऑनलाइन रमी खेळण्याचे व्यसन होते, अशी माहिती तळेगाव दाभाडे पोलिसांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: death , Pune
  • First Published :
जाहिरात
जाहिरात