मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुण्यात Tiktok स्टार समीर गायकवाडने केली आत्महत्या, गळफास लावत संपवलं जीवन

पुण्यात Tiktok स्टार समीर गायकवाडने केली आत्महत्या, गळफास लावत संपवलं जीवन

Tik Tok Star Samir Gaikwad Commits Suicide in Pune:  टिकटॉक स्टार असणाऱ्या समीरने प्रेमप्रकरणामुळे आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

    पुणे, 21 फेब्रुवारी : पुण्यातील टिकटॉक स्टार समीर गायकवाड याने आत्महत्या केली आहे. 22 वर्षीय समीरने रविवारी सायंकाळी 5 वाजता आपल्या राहत्या घरात पंख्याला साडी बांधत गळफास घेऊन जीवन संपवलं.

    समीर गायकवाड हा व्हिडिओच्या हटके स्टाईलमुळे अल्पावधीतच तरुणाईमध्ये लोकप्रिय झाला होता. टिकटॉकवरील त्याचे अनेक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यामुळे तो कायमच चर्चेत असत. मात्र आता त्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत 'लोकमत'ने वृत्त दिलं आहे.

    टिकटॉक स्टार असणाऱ्या समीरने प्रेमप्रकरणामुळे आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. समीर गायकवाड हा पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता.

    भावाने दिली पोलीस स्थानकात माहिती

    एका खोलीत समीरने गळफास घेतल्याचं त्याच्या कुटुंबियांच्या लक्षात आलं. त्यानंतर समीरच्या भावाने तातडीने जवळच्या पोलीस स्थानकात याबाबतची माहिती दिली. पोलिसांना घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट आढळलेली नाही. त्यामुळे समीरच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

    First published:

    Tags: Crime news, Love, Pune news, Samir gaikwad, Shocking news, Suicide, Tik tok