Home /News /pune /

पुण्यात हॉटेल चालकाचा निर्घृण खून, डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून संपवलं

पुण्यात हॉटेल चालकाचा निर्घृण खून, डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून संपवलं

काही व्यक्तींनी हॉटेल परिसरात येऊन अज्ञात कारणावरून त्यांच्या डोक्यात धारदार हत्याराने वार केले.

पुणे, 13 जून : अज्ञात कारणावरून नऱ्हे परिसरात एका इसमाच्या डोक्यात धारदार हत्याराने वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. सुनील बारकु लांगोरे (वय :45, रा. अभिनव कॉलेज रस्ता, नऱ्हे, मूळ : नांदोशी, तालुका हवेली, पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सुनील लांगोरे यांचा नऱ्हे परिसरात छोटासा हॉटेल व्यवसाय असून त्याचबरोबर ते गॅसच्या टाक्या पुरवण्याचे काम करत असत. सध्या लॉकडाऊनमुळे हॉटेल व्यवसाय बंद असला तरी ते हॉटेलच्या आवारात गॅसच्या पावत्या बनवणे, तसंच गॅस घरपोच देण्याचे काम करत होते. कोरोणा विषाणूच्या संसर्गामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब मूळ गावी नांदोशी या ठिकाणी गेले असल्याचे समजते. त्यामुळे सध्या ते एकटेच राहत होते. काही व्यक्तींनी हॉटेल परिसरात येऊन अज्ञात कारणावरून त्यांच्या डोक्यात धारदार हत्याराने वार केले. यामध्ये ते गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके यांनी घटनास्थळी तत्काळ भेट दिली असून सदर खुनाबाबत सिंहगड रस्ता पोलीस अधिक तपास करत आहेत नगरमध्येही घडलं हत्याकांड शिर्डीमध्ये एका अज्ञात इसमाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली आहे. साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल शेजारी असणाऱ्या नगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयात आज सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान एकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला आहे. अंगावर कपडे नसलेल्या अवस्थेत पडलेल्या या साधारण 40 वर्षीय इसमाच्या डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश सिंग यानी घटनास्थळी धाव घेतली. डॉग स्कॉड आणी फॉरेन्सिक विभागानेही आरोपींचा माग घेण्याचा प्रयत्न केला आहे. संपादन - अक्षय शितोळे
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Pune crime, Pune murder case

पुढील बातम्या