पुणे, 15 ऑगस्ट : स्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही शिस्त मोडल्या गेल्याचा एक व्हिडियो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. आज सकाळी 8 वाजताच्या दरम्यान पिंपरी चिंचवड शहरातील काळभोर चौकात, महापौर राहुल जाधवांनी अत्यंत घाईने ध्वजारोहन केलं आणि चक्क ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत राष्ट्रगान केलं. हा प्रकार ध्वज आचार संहितेचा भंग तर आहेच, शिवाय राष्ट्रीय कार्यक्रमादरम्यान घडलेला अवमान ही आहे. त्यामुळे महापौर राहुल जाधव, उपमहापौर सचिन चिंचवडवे आणि अशी सलामी देणारे सत्ताधारी भाजपचे पक्ष नेते एकनाथ पवार यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली जातेय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







