पुणे, 22 मे : पुणे जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाही. पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात सर्वाधिक 291 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनाची लागण झालेल्या 14 जणांचा आज मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात 168 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 49 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. आजच्या धक्कादायक आकडेवारीनंतर पुण्यात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4398 वर पोहोचली आहे. डॉ. नायडू हॉस्पिटल आणि खासगी हॉस्पिटलमध्ये 3977 आणि ससूनमध्ये 421 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ही 1698 इतकी असून आतापर्यंत एकूण मृत्यू 241 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज 2371 जण कोरोनातून बरे होवून घरी गेले आहेत. पुण्यात आज 1735 नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली. दरम्यान, महाराष्ट्रात आतापर्यंतची एक दिवसांतली सर्वाधिक रुग्णांची वाढ शुक्रवारच्या आकड्यांमधून समोर आली. मुंबई, उपनगरं आणि पुण्यात गेल्या 24 तासांत खूप जास्त कोरोनाग्रस्त आढळले आहेत. दिवसभरात तब्बल 2940 रुग्ण राज्यभरातून वाढले आहेत. त्यातली सर्वाधिक वाढ अर्थातच मुंबईत दिसून आली. राज्यभरात कोरोनाबळींच्या संख्येने दीड हजाराचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या 24 तासांत 63 मृत्यू नोंदले गेल्याने कोरोनाबळींची संख्या 1517 वर पोहोचली आहे.राज्य सरकारने शुक्रवारी संध्याकाळी पाठवलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात एकूण रुग्णसंख्या 44582 वर पोहोचली आहे. दिवसभरातल्या 63 कोरोना मृत्यूंपैकी मुंबईत 27 आणि पुण्यात 9 मृत्यूंची नोंद झाली आहे. संपादन - अक्षय शितोळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.