पुणे जिल्ह्यात भीषण अपघात, टॅक्टर थेट दरीत पलटला; 2 जण जागीच ठार

पुणे जिल्ह्यात भीषण अपघात, टॅक्टर थेट दरीत पलटला; 2 जण जागीच ठार

या अपघातात टॅक्टरमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

  • Share this:

पुणे, 28 डिसेंबर : पुणे जिल्ह्यातील भिमाशंकर परिसरात आव्हाट इथं डबर वाहतूक करणाऱ्या टॅक्टरचा आज सायंकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात टॅक्टरमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

दत्ता पुनाजी आढळ( वय 33) आणि विलास गंगाराम बुरुड (वय 29 )असं अपघातात जागीच मृत्यू झाल्यांची नावे आहेत, तर संतोष सोमाजी किर्वे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्नालयात उपचार सुरू आहेत.

नेमकं काय घडलं?

भिमाशंकर- राजगुरुनगर या मार्गावरील आव्हाट येथील एक टॅक्टर ट्रॉलीतून दगडी डबर घेऊन जात असताना एका वळणावर टॅक्टर चालकाचा अचानक वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे काही क्षणात टॅक्टरसह ट्रॉली बाजूच्या दरीत पलटी झाली. यावेळी टॅक्टरमध्ये चालकासह दोघेजण प्रवास करत होते. या भीषण अपघातात टॅक्टरसह ट्रॉलीचा चक्काचूर झाला असुन दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

दरम्यान, राजगुरुनगर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आणि अपघातातील जखमीला स्थानिकांच्या मदतीने खासगी रुग्नालयात दाखल केलं आहे. घटनेचा पंचनामा करण्यात आला असल्याचं पोलीस निरीक्षक सतिष गुरव यांनी सांगितलं.

Published by: Akshay Shitole
First published: December 28, 2020, 10:54 PM IST

ताज्या बातम्या