प्रियांका माळी, प्रतिनिधी पुणे, 26 जून : माणुसकी आणि भूतदया म्हणजेच प्राणीमात्रांवरील प्रेम हेच माणसाच्या जिवंतपणाचे लक्षण असते. माणसांमधील भावना, करुणा हीच त्याला माणूस बनवते. माणसाच्या प्राणीमात्रांवरील जिव्हाळ्याची आजपर्यंत तुम्ही अनेक उदाहरणे ऐकली असतील. अशीच एक घटना नुकतीच घडली. रोहिडा किल्ल्यावर भटकंतीसाठी गेलेल्या पुण्यातील काही ट्रेकर्सने प्रसंगावधान राखत एका भेकराचा (हरणाचे पिल्लू) जीव वाचवला. मुक्या प्राण्यांचा जीव वाचावा म्हणून या तरुणानं केलेली धडपड सर्वांसाठीच आदर्श ठरणारी आहे. काय घडला प्रसंग? रविवारी पुण्याहून भटकंतीसाठी काही ट्रेकर्स रोहिडा किल्ल्यावर आले होते. त्यांना रस्त्यातच म्हणजेच किल्ल्याजवळ एक भेकर रक्ताच्या थारोळ्यात आढळले. काही कुत्र्यांनी भेकरावर प्राणघातक हल्ला केला होता. या ट्रेलर्सने भेकराला कुत्र्यांच्या तावडीतून सुखरूप सोडविले. भोरच्या शिलेदार प्रतिष्ठान प्रमुख राजेश महांगरे यांच्याशी संपर्क साधून किल्ल्याच्या पायथ्याशी या भेकराला वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले.
उत्तम राठोड, राकेश विधाते, राम मोरे, अक्षय शिंदे आणि सुकांत पाने या ट्रेकर्सी भेकराचा जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ‘आम्ही रोहिडा किल्ल्यावर ट्रेकला गेलो होतो. त्यावेळी काही कुत्र्यांनी भेकरावर हल्ला केलेलं आम्ही पाहिलं. या कुत्र्यांनी भेकराला खूप ठिकाणी चावा घेतला होता. त्यामुळे ते रक्ताच्या थारोळ्यात तडफडत होते. आता भात शेती पुरे, शेतकऱ्याने शेतात केला नवीन प्रयोग, शून्य मशागत करून लाखो रुपये कमावले आम्ही त्यानंतर तातडीनं भेकराला खांद्यावर घेऊन गड उतरला. काही क्षणातच वनाधिकारी आणि डॉक्टर त्या ठिकाणी पोहोचले जखमी भेकराला औषधोपचार केला. त्याला पुन्हा एकदा निसर्गाच्या सान्निध्यात रोहिडा किल्ल्याच्या पायथ्याशी मुक्त केले, अशी माहिती या तरुणांनी दिली.