10 वीच्या भूगोलाच्या पेपरचे मार्क कसे देणार? बोर्डाने केलं स्पष्ट

10 वीच्या भूगोलाच्या पेपरचे मार्क कसे देणार? बोर्डाने केलं स्पष्ट

भूगोल विषयात विद्यार्थ्यांना कसे गुण देणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत अखेर राज्य मंडळाने निर्णय घेतला आहे.

  • Share this:

पुणे, 27 मे : जगाच्या विविध भागांमध्ये कोरोना व्हायरस नावाचं संकट धडकल्यानंतर त्याचा जनजीवनावर मोठा परिणाम झाला. अनेक स्पर्धा, कार्यक्रम रद्द करावे लागले. महाराष्ट्रात दहावीच्या विद्यार्थ्यांचा भूगोल विषयाचा पेपरही (ssc result 2020 maharashtra board) कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घेणं शक्य झालं नाही. त्यामुळे या विषयात विद्यार्थ्यांना कसे गुण देणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत अखेर राज्य मंडळाने निर्णय घेतला आहे.

10 वीच्या विद्यार्थ्यांना भूगोल विषयात इतर विषयातील गुणांच्या सरासरीच्या आधारे गुण मिळणार आहेत. याबाबत राज्य मंडळाकडून माहिती देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील संभ्रम दूर झाला आहे.

दरम्यान, कोरोना संकटामुळे राज्यातील अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. याबाबत शिक्षणमंत्री आणि राज्यपालांमध्ये मतभेद झाल्याचंही पाहायला मिळालं होतं. त्यानंतर शिक्षणमंत्र्यांनी पुन्हा समोर येत भूमिका स्पष्ट केली.

अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत काय आहे शिक्षणमंत्र्यांची भूमिका

'अंतिम सत्राच्या परीक्षेसंदर्भात काय निर्णय घ्यावा, याबद्दल राज्यपाल महोदयांशी सविस्तर चर्चा झाली असून राज्य समितीने दोन दिवसांमध्ये परीक्षेसंदर्भात एक प्रारूप आराखडा तयार करून तो अहवाल राज्यपाल महोदय आणि शासनास सादर करावा आशा सूचना आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कुलगुरुंसोबत झालेल्या बैठकीमध्ये देण्यात आल्या,' अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.

'अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना ग्रेड देऊन पुढे पाठवायचे की कसे, यावरही चर्चा करण्यात आली. हा निर्णय घेत असताना एकाही विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून त्यांना पुढे अडचणी येऊ नयेत असाच निर्णय घेण्यात येईल. त्याच बरोबर शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीय दर्जावरही याचा काही परिणाम होणार नाही याची दक्षता घेऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि मानसिक स्थितीचा पूर्णपणे विचार केला जाईल. वस्तुस्थितीचा अंदाज घेऊन शिक्षणाची गुणवत्ता कायम ठेवत विद्यार्थी हिताचाच निर्णय घेतला जाईल,' असंही शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

संपादन - अक्षय शितोळे

First published: May 27, 2020, 7:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading