पुण्यात आईच्या मदतीने प्रियकराने अल्पवयीन मुलीचा केला विनयभंग, जीवे मारण्याचीही धमकी!

पुण्यात आईच्या मदतीने प्रियकराने अल्पवयीन मुलीचा केला विनयभंग, जीवे मारण्याचीही धमकी!

पीडित मुलीची आई व तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

  • Share this:

पुणे, 13 ऑगस्ट : प्रियकराने आईच्या मदतीनेच अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यात घडली आहे. आईचा प्रियकर जबरदस्तीने मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवत अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन करत असल्याचा प्रकार शिरुर शहर परिसरात घडला आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे पीडित मुलीची आई व तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

शिरूर येथील पीडित मुलीची आई आणि तिचा विजय पाटील नामक प्रियकराला नेहमी घरात येत असून दोघेदेखील घरात दारू पिऊन अश्लील कृत्य करत. यावेळी विजय पाटील हा पीडितेला मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवचा. तसंच 'तुझी आई आणि मी जे करतो ते माझ्यासोबत कर... तुला मजा येईल,' असं म्हणत मुलीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत असे.

मुलगी प्रतिसाद देत नसल्याने याबाबत कोणाला काही सांगितले तर तुला मारून टाकीन अशी धमकी देखील आरोपीकडून देण्यात येई. तर पीडितेची आई देखील मुलीला तिचा प्रियकर विजय पाटील हे तुझे वडील आहेत, त्यांना तू पप्पा म्हणत जा आणि ते तुला जसे म्हणतात तू तसे करत जा, असं सांगत असे. याबाबत आई व आईच्या प्रियकराकडून होणारे अत्याचार असह्य होऊ लागल्याने पीडितेने तिच्या आत्याला याबाबत सर्व हकीगत सांगितली.

या सगळ्या प्रकारानंतर पीडित मुलीच्या आत्याने शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. त्यानंतर शिरूर पोलिसांनी पीडित अल्पवयीन युवतीची आई व तिचा प्रियकर विजय अर्जुन पाटील रा. खारमळा शिरूर ता. शिरूर जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करत दोघांना देखील अटक केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रविन खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे हे करत आहे.

Published by: Akshay Shitole
First published: August 13, 2020, 11:12 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading