जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / Express Highway : गुरूवारी पुणे-मुंबई प्रवास करणार असाल तर...बातमी तुमच्या कामाची

Express Highway : गुरूवारी पुणे-मुंबई प्रवास करणार असाल तर...बातमी तुमच्या कामाची

पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर ब्लॉक

पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर ब्लॉक

पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर उद्या म्हणजेच 27 जुलैला पुन्हा दोन तासांचा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. उद्या दुपारी 12 ते 2 या वेळेत सैल झालेल्या दरडी हलवल्या जाणार आहेत.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 26 जुलै : पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर उद्या म्हणजेच 27 जुलैला पुन्हा दोन तासांचा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. उद्या दुपारी 12 ते 2 या वेळेत सैल झालेल्या दरडी हलवल्या जाणार आहेत. या वेळेत हलकी वाहतूक मॅजिक पॉईंटपासून जुन्या पुणे मुंबई महामार्गाकडे वळवली जाईल. तर अवजड वाहतूक किवळे पासून जुन्या पुणे मुंबई महामार्गाकडे वळवली जाईल. पुण्याकडे येणारी वाहतूक मात्र सुरूच राहील, अशी माहिती देण्यात आली आहे. याआधी रविवारी रात्री पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर डोशी बोगद्याजवळ किलोमीटर 41 जवळ दरड कोसळली होती, त्यामुळे पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या तीन लेन बंद करण्यात आल्या. तर मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. मागचा आठवडाभर मावळ भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळतो आहे, त्यामुळे दरड कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे, यामुळे गुरूवारी सैर झालेल्या दरडी हटवण्याचं काम करण्यात येणार आहे. दुसरीकडे गुरूवारी मुंबईमध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे, त्यामुळे मुंबईतल्या सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तसंच रेड अलर्टमुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आलं आहे. मुंबईसह कोकण आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाने धुडगूस घातला आहे. भारतीय हवामान खात्याने मुंबई महानगराला 26 जुलै रात्री 8 ते उद्या 27 जुलै दुपारपर्यंत अति मुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे. रत्नागिरीमध्येही रेड अलर्ट असल्यामुळे शाळांना सुट्टी द्यायचा निर्णय घेण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात