मराठी बातम्या /बातम्या /पुणे /Pune Byelections : कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवार ठरले? घोषणेआधीच फुटली नावं!

Pune Byelections : कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवार ठरले? घोषणेआधीच फुटली नावं!

मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पुण्याच्या कसबा पेठ आणि चिंचवडमध्ये विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे.

मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पुण्याच्या कसबा पेठ आणि चिंचवडमध्ये विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे.

मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पुण्याच्या कसबा पेठ आणि चिंचवडमध्ये विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 2 फेब्रुवारी : मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पुण्याच्या कसबा पेठ आणि चिंचवडमध्ये विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. या दोन्ही मतदारसंघात कोण उमेदवार असणार यासाठी मुंबईत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या बैठकीला मार्गदर्शन करत आहेत. मागच्या तीन तासांपासून ही बैठक सुरू आहे. एकीकडे ही बैठक सुरू असतानाच पुण्यामधू मात्र मोठी अपडेट समोर आली आहे.

महाराष्ट्र प्रदेश भाजपकडून प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये पुण्यातून कुणाल टिळक यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कुणाल टिळक हे मुक्ता टिळक यांचे पूत्र आहेत. या नियुक्तीमुळे कसबा उमेदवारीबाबतची उत्सुकता वाढली आहे.

दुसरीकडे चिंचवडची उमेदवारी जगताप यांच्या घरातच दिली जाईल, असं भाजपचे राज्य उपाध्यक्ष संजय काकडे म्हणाले आहेत. कसबा आणि चिंचवडची निवडणूक बिनविरोध होणं शक्य नाही. आम्ही याची अपेक्षाही ठेवली नसल्याची प्रतिक्रिया संजय काकडे यांनी दिली आहे.

दुसरीकडे कसबा आणि चिंचवड या दोन्ही ठिकाणी काँग्रेसची जागा असल्याचं सांगत नाना पटोले यांनी दावा ठोकला आहे. उद्या महाविकासआघाडीची बैठक घेऊन निर्णय घेऊ असं नाना पटोले म्हणाले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना चिंचवडच्या जागेसाठी आग्रही आहे.

First published:

Tags: BJP