जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / पुण्याच्या धायरीत अग्नितांडव, 6 कारखाने जळाले, आठ-दहा स्फोट, Video

पुण्याच्या धायरीत अग्नितांडव, 6 कारखाने जळाले, आठ-दहा स्फोट, Video

पुण्याच्या धायरीमध्ये भीषण आग

पुण्याच्या धायरीमध्ये भीषण आग

पुण्याच्या धायरी परिसरामध्ये लागलेली भीषण आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन विभागाला यश आलं आहे. धायरीमध्ये लागलेल्या या आगीमध्ये 6 छोटे कारखाने जळाले आहेत.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी : पुणे, 14 मार्च : पुण्याच्या धायरी परिसरामध्ये लागलेली भीषण आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन विभागाला यश आलं आहे. धायरीमध्ये लागलेल्या या आगीमध्ये 6 छोटे कारखाने जळाले आहेत. फर्निचर, वाहन दुरुस्ती, रंग स्प्रे बनवणे या प्रकारचे हे कारखाने होते. आगीच्या घटनास्थळी सिलेंडर आणि केमिकल बॅरलचे 8-10 स्फोट झाले. तसंच यामध्ये 2 दुचाकी आणि 2 चारचाकी वाहनांनीही पेट घेतला होता. पुणे आणि पीएमआरडीए कडच्या 10 वाहनांच्या साहाय्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग पूर्ण विझवली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झालं नाही किंवा जिवितहानी झाली नाही. संध्याकाळी 7.10 मिनिटांच्या सुमारास ही आग लागली होती, तर 9 वाजता कुलिंग झालं. रंग निर्मिता कारखान्यामध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन ही भीषण आग लागली होती.

जाहिरात

धायरी मध्ये अनेक रूपाने सुरू असलेल्या विविध प्रकारच्या कारखान्यांचा फटका आज सर्वसामान्य नागरिकांच्या वसाहतीला बसला. रंग निर्मिती कारखान्याच्या आतील सिलेंडरचे आठ ते दहा वेळा स्पोर्ट होऊन प्रचंड मोठी आग लागली. ही आग आटोक्यात आली असली तरी या निमित्त नागरी वस्त्यांमधील केमिकल कंपन्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. धायरीसारख्या उपनगरांमध्ये मोठं नागरिकरण झाल्याने आता तिथली औद्योगिक वर्कशॉप हे आगीच्या घटनांचं कारण बनू लागलेत. गेल्या वर्षभरातील अशाप्रकारची ही 8 वी घटना आहे, म्हणून पालिकेनं या भागात सुरक्षा संबंधीच्या प्रश्नावर ऑडिट करावं, अशी मागणी धायरीतील रहिवाशांनी केलीय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात