जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / पुणे जिल्ह्यातून चांगली बातमी! वृद्धाश्रमातल्या 47 जणांची कोरोनावर यशस्वी मात

पुणे जिल्ह्यातून चांगली बातमी! वृद्धाश्रमातल्या 47 जणांची कोरोनावर यशस्वी मात

पुणे जिल्ह्यातून चांगली बातमी! वृद्धाश्रमातल्या 47 जणांची कोरोनावर यशस्वी मात

सध्या कोरोना विषाणू प्रसाराची दुसरी लाट (Corona Second Wave in India) वेगाने पसरत आहे. आधीपासूनच गंभीर आजार असलेल्या रुग्णांची स्थिती बिकट आहे. मात्र पुणे जिल्ह्यातल्या वृद्धाश्रमातील तब्बल 47 जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात करत जगण्याची एक नवी उमेद दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

वेल्हे (पुणे), 22 एप्रिल : सध्या कोरोना विषाणू प्रसाराची दुसरी लाट (Corona Second Wave in India) वेगाने पसरत आहे. याचा संसर्ग झालेल्या वृद्ध आणि आधीपासूनच गंभीर आजार असलेल्या रुग्णांची स्थिती बिकट आहे. यात अनेकजण भीतीने आपली जगण्याची आशाही सोडून देत आहेत. मात्र, वेल्हे येथील वृद्धाश्रमातील तब्बल 47 जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात करत जगण्याची एक नवी उमेद दिली आहे. रानवडी येथील जनसेवा फाउंडेशनच्या वृद्धाश्रमातील तब्बल 47 रुग्ण बुधवारी (ता. 21) तेरा दिवसांनंतर कोरोनाला (India Fight Corona) हरवून पुन्हा वृद्धाश्रमात दाखल झाले आहेत. हे 47 जण खूप वयस्कर आहेत. तसेच, यातील काहींना तर बेडवरून हलता सुद्धा येत नव्हते. जवळपास सगळ्यांनाच विविध व्याधी जडलेल्या आहेत. अशात त्यांना कोरोनाची लागण होणे गंभीर होते. याचे आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनासमोर खूप मोठे आव्हान होते. ज्यावेळी या वृद्धाश्रमातील पहिला वृद्ध पॉझिटिव्ह आला होता, तेव्हा प्रशासनाने आणि आरोग्य यंत्रणेने तातडीने पावले उचलून वृद्धाश्रमातील 165 वृद्धांची तपासणी केली. त्यातील तब्बल 47 रुग्ण पॉझिटिव्ह आले. या सर्व रुग्णांची अवस्था इतकी गंभीर होती की, त्यांना तेथून हलवता येणे सुद्धा अशक्य होते. त्यांच्यावर आहे तेथेच उपचार करणे हेही फार मोठे आव्हान आरोग्य यंत्रणेपुढे होते. मात्र, हे आव्हान पेलत या सर्व वृद्धांना कोरोनामुक्त करण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. हे वाचा -  ‘पोलिसांनीच दंडकारण्यामध्ये बाँम्ब फेकले’, माओवाद्यांचे गंभीर आरोप पोलिसांनी फेटाळले आरोग्य, महसूल, पोलीस विभाग या सर्वांनी दिवस-रात्र मेहनत घेत वृद्धांची काळजी घेऊन त्यांना या गंभीर आजारातून सुखरूप बाहेर काढले. यंत्रणांनी मनुष्यबळ कमी असतानाही 47 जणांचे प्राण वाचवले आहेत. आपत्तीच्या काळात वेल्हे प्रशासन अतिशय खडतर परिश्रम घेत आहे जीवाची पर्वा न करता वृद्धांची रुग्णांची काळजी घेत आहे, असे वेल्ह्याचे तहसीलदार शिवाजी शिंदे म्हणाले. भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कुमार जाधव, वेल्हेचे तहसीलदार शिवाजी शिंदे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, आरोग्य अधिकारी अंबादास देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोहर पवार आणि त्यांच्या पथकाने परिस्थितीत चांगली कामगिरी केल्याचे ते म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात