पुणेकरांसाठी सर्वात आनंदाची बातमी, पहिल्यांच डिस्चार्ज रुग्णांची संख्या नवीन रुग्णांपेक्षा दुप्पट

(संग्रहित फोटो)

अनलॉकच्या प्रक्रियेनंतर पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या अतिशय वेगाने वाढली.

  • Share this:
पुणे, 3 ऑगस्ट : राज्यभरात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सर्वात मोठा फटका पुणे शहराला बसला होता. कारण अनलॉकच्या प्रक्रियेनंतर पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या अतिशय वेगाने वाढली. मात्र त्यानंतर आता पुणेकरांसाठी एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. पुण्यात पहिल्यांदाच डिस्चार्ज रूग्णांची संख्या नवीन रूग्णांच्या दुप्पट आढळली. पुण्यात सोमवारी दिवसभरात 781 नवे रूग्ण आढळले तर तब्बल 1822 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तसंच एकूण ॲक्टिव्ह रूग्ण संख्याही 1 हजाराने घटली आहे. पुण्यात आता 16981 ॲक्टिव्ह रूग्ण आहेत. रविवारी हाच आकडा 18 हजारांपेक्षा अधिक होता. त्यामुळे आज आलेल्या आकडेवारीने पुणेकरांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. पुणे जिल्ह्यात रविवारी 3 हजार नवे रुग्ण सापडले होते, तर सोमवारी हाच आकडा 1998 वर घसरला आहे. राज्यातही कोरोना स्थितीत काहीशी सुधारण राज्यात सलग तिसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक असून आज दिवसभरात 10 हजार 221 रुग्ण बरे होऊन घरी गेले तर 8968 नवीन रुग्णांची नोंद झाली. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्याने राज्यातील ॲक्टीव्ह रुग्णांची (उपचार सुरू असलेले) संख्याही कमी होत आहे. आतापर्यंत राज्यभरात 2 लाख 87 हजार 30 रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण 63.76 टक्के आहे. तर सध्या 1 लाख 47 हजार 17 रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. आज निदान झालेले 8968 नवीन रुग्ण आणि नोंद झालेले 266 मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-970 (46), ठाणे- 203 (5), ठाणे मनपा-244 (5),नवी मुंबई मनपा-322 (7), कल्याण डोंबिवली मनपा-247 (2),उल्हासनगर मनपा-54 (4), भिवंडी निजामपूर मनपा-23 (2) , मीरा भाईंदर मनपा-130 (4),पालघर-132, वसई-विरार मनपा-227 (3), रायगड-232 (3), पनवेल मनपा-173(2) यासह इतर जिल्ह्यातील रुग्णांचा समावेश आहे.
Published by:Akshay Shitole
First published: