पुण्यात कोरोना रुग्णाबाबत धक्कादायक प्रकार, केवळ 5 दिवसात दिला डिस्चार्ज

पुण्यात कोरोना रुग्णाबाबत धक्कादायक प्रकार, केवळ 5 दिवसात दिला डिस्चार्ज

रुग्णालयांना अधिकची खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात येत असताना एका खासगी रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडला आहे.

  • Share this:

पुणे, 23 मे : पुणे शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग वाढताना पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 5 हजारांवर गेला आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णालयांना अधिकची खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात येत असताना एका खासगी रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडला आहे. कोरोनाबाधित रुग्णाला केवळ 5 दिवसांमध्ये डिस्चार्ज दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथील महिलेला कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर या महिलेवर पुण्यातील एका प्रतिष्ठित खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचाराच्या अवघ्या पाच दिवसांनंतर रुग्णालयाकडून या महिलेला घरी सोडण्यात आलं. डिस्चार्ज मिळाल्यानंतर महिला खासगी वाहनाने घरी पोहोचली. याबाबत परिसरात नागरिकांमध्ये मोठी चर्चा झाल्यानंतर यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींनी झेडपी सिओईकडे तक्रार केली.

महिलेच्या पतीला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला होता, त्यानंतर पत्नीसह पाच जणांना प्रादुर्भाव आढळून आला होता.

लोकप्रतिनिधींच्या तक्रारीची दखल घेऊन रूग्णालयाला खुलासा करण्यास बजावण्या आलं. याच तक्रारी आणि चौकशीनंतर पुन्हा महिला रुग्णालयात दाखल झाली आहे. मात्र कोरोनाचा संसर्ग वाढत असताना रुग्णालयाच्या या गलथानपणाची मोठी किंमत चुकवावी लागू शकते. त्यामुळे यापुढील काळात अशा घटना टाळण्यासाठी शासन, प्रशानाकडून नेमका काय निर्णय घेतला जातो, हे पाहावं लागेल.

दरम्यान, सदर महिलेच्या पतीला कोरोना प्रादुर्भाव झाला होता. त्यानंतर पत्नीसह जवळच्या नातेवाईकांना जवळच्या पाच नातेवाईकांना बाधा झाली. पती आणि या महिलेला पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं. तर संपर्कातील इतर अहवाल निगेटिव्ह आलेले 11 जण क्वारन्टाइन आहेत. पोरांना बाधित रुग्ण झाला तर तो कोरणा मुक्त झाल्याचा अहवाल येण्यासाठी किमान दहा दिवसाचा कालावधी लागतो. या प्रकरणी तक्रार केल्यानंतर पुन्हा या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

संपादन - अक्षय शितोळे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2020 06:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading