• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • पुण्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात?, महापौरांचं महत्त्वाचं ट्वीट

पुण्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात?, महापौरांचं महत्त्वाचं ट्वीट

Pune Corona Updates: शहरात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या काही प्रमाणात नियंत्रणात आली.

 • Share this:
  पुणे, 03 जून: पुणे (Pune) शहरात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शहरात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या काही प्रमाणात नियंत्रणात आली. त्यानंतर शहरातला विकेंन्ड लॉकडाऊन (Lockdown) ही रद्द करण्यात आला. आता 1 जूनपासून जिल्ह्यातील काही निर्बंध शिथील करण्यात आलेत. दरम्यान पुणे शहरानं 1 जूनला कोरोना (Corona Test) चाचण्यांच्या संख्येत 25 लाखांचा टप्पा पार केला आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यासंदर्भातलं ट्वीट केलं आहे. महापौरांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, चाचण्यांच्या संख्येत सातत्य ठेवल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. कोरोनाच्या लढ्यातील महत्त्वाचा टप्पा पार पडला असून 1 जूनला कोरोना चाचण्यांची संख्या 25 लाखांच्या पुढे गेली आहे. पुणे शहरात बुधवारी एकताच दिवसात 7 हजार 483 जणांचे नमुने घेतले. शहराची एकूण चाचण्यांची संख्या आता 25 लाख 10 हजार 184 इतकी झाली आहे. शहरातील कोरोनाची परिस्थिती बुधवारी शहरात नव्याने 467 कोरोनाबाधित नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे पुणे शहरातील एकूण संख्या आता 4 लाख 70 हजार 778 इतकी झाली आहे.  गेल्या 24 तासात पुणे जिल्ह्यात एकूण 1836 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी शहरात 467, पिंपरी चिंचवड 372, जिल्हा परिषद कार्यक्षेत्र 803, नगरपालिका क्षेत्र 170, कॅंटोन्मेंट बोर्ड 24 रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात गेल्या 24 तासात 3 हजार 502 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून शहरातील 651 कोरोनाबाधितांना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला. शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 57 हजार 160 इतकी झाली आहे. जिल्ह्यात काल मृतांचा आकडा 60 होता. त्यापैकी शहरात 29 जणांचा मृत्यू कोरोनानं झाला. शहरातील मृतांचा एकूण आकडा 8 हजार 313 च्यावर पोहोचला आहे. सद्यस्थितीत शहरात एकूण 5 हजार 305 रुग्णांवर उपचार सुरु असून त्यापैकी 761 जणांची स्थिती गंभीर असल्याचं समजतंय.
  Published by:Pooja Vichare
  First published: