पुणे, 22 जुलै: आतापर्यंत तुम्ही सोनं-नाणं, पैसा-आडका, मौल्यवान वस्तूंची चोरी झाल्याच्या घटना ऐकल्या असतील. पण पुण्यात चक्क कचारकुंड्यांची चोरी झालीय. शिवाजीनगर ते डेक्कन बसस्थानक दरम्यान कायम वर्दळीचा जंगली महाराज रोड आहे. याच वर्दळीच्या रस्त्यावरून तब्बल 25 कचराकुंड्या चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. त्यातच शहरावर वॉच ठेवणारा तिसरा डोळा म्हणजेच सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडल्याने चोरट्यांचे धाडस वाढत असून नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. कचराकुंड्या केल्या लंपास पुण्यातील जंगली महाराज रोड हा नेहमी वर्दळीचा आहे. या रोडवर पुणे महापालिका आणि स्मार्ट सिटी योजनेतून स्टेनलेस स्टीलच्या कचराकुंड्या बसवण्यात आल्या होत्या. यातील बालगंधर्व पोलीस ठाण्याच्या समोरची कचराकुंडी वगळता इतर सर्व कचराकुंडी चोरीला गेल्या आहेत. कचराकुंडी कापून नेल्याने उरेलल्या फ्रेम्स पादचाऱ्यांना धोकादायक ठरत आहेत. तर वर्दळीच्या ठिकाणीच सार्वजनिक मालमत्तेची चोरी होत असल्याने शहरातील सुरक्षेचा प्रश्नही चव्हाट्यावर आला आहे.
तिसरा डोळा बंद पुण्यात विविध ठिकाणी महापालिकेने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. पण काही ठिकाणी ते बंद पडलेल्या स्थितीत आहेत. त्यामुळे शहरावर असणाऱ्या कॅमेऱ्यांच्या नजरेचा धाक कमी झाला आहे. त्यामुळे चोरट्यांनी थेट वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यावर चोरी केली आहे. महापालिकेने तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करावेत, अशी मागणी होत आहे. धक्कादायक! भर पावसात रस्त्यावर आढळलं पिशवीत गुंडाळलेलं अर्भक; पिपंरी-चिंचवडमध्ये खळबळ पुण्यासाठी लाजिरवाणी घटना पुण्याची फार मोठी गुन्हेगारीची शोधून काढणे हे फार अवघड नाहीये परंतु पुण्यामध्ये जंगली महाराज सारखा वाहता रस्ता ज्याच्यामध्ये सीसीटीव्ही असायला पाहिजे. जिथे 24 तास लोक असतात तिथून जर असे डबे चोरीला जात असतील तर पुणेकरांसाठी आणि महापालिकेसाठी अत्यंत लांच्छनास्पद गोष्ट आहे. याच्यावर दखल घ्यायला पाहिजे. परंतु सीसीटीव्ही जर चालू नसतील तर जबाबदार कोण असा प्रश्न पडतो. संबंधितांवर कारवाई केली झाली पाहिजे. कारण अशाच प्रकारामुळे सर्व प्रकारची गुन्हेगारी वाढते. सीसीटीव्ही असेल तर कोणाचं कुठल्याही गोष्टीला हात लावायचं धाडस होणार नाही. सीसीटीव्ही असताना जर या गोष्टी घडत असतील तर त्याच्याकडे दुर्लक्ष न करता त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, असे पुणेकर नागरिक विजय कुंभार म्हणाले.