जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / हॅरी पॉटरपासून मिळाली प्रेरणा, पुण्यातली बच्चे कंपनी करतीय मोठ्यांनाही अवघड वाटणारं काम

हॅरी पॉटरपासून मिळाली प्रेरणा, पुण्यातली बच्चे कंपनी करतीय मोठ्यांनाही अवघड वाटणारं काम

हॅरी पॉटरपासून मिळाली प्रेरणा, पुण्यातली बच्चे कंपनी करतीय मोठ्यांनाही अवघड वाटणारं काम

पुण्यातील या बच्चे कंपनीनं मोठ्यांनाही अवघड वाटेल असं काम करून दाखवलंय.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 28 जुलै : शहरातील टेकड्या आणि त्यावरील झाडं हा अभिमानाचा आणि संवर्धनाचा विषय आहे. शुद्ध हवा राहण्यासाठी, व्यायाम करण्यासाठी, सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी या टेकड्या जपणे आवश्यक आहे. पण, जवळपास सर्वच शहरातील प्रमुख टेकड्यांवर अस्वच्छता वाढलीय. टेकड्या अस्वस्छ आहेत, अशी ओरड करत बसण्यापेक्षा थेट टेकडीवर जाऊन ती स्वच्छ करण्याचा निर्धार पुण्यातल्या बच्चे कंपनीनं केलाय. ओजस फाटक या सध्या दहावीमध्ये असलेल्या मुलानं गेलया तीन वर्षांपासून ही मोहीम सुरू केलीय. त्यानं सुरूवातीला त्याच्या सोयायटीजवळची टेकडी एकट्यानं साफ करण्यास सुरुवात केली. ओजसच्या आई आभा भागवत-फाटक यांनी या मोहिमेला भक्कम पाठिंबा दिला. त्यानंतर ओजससोबत इतर मंडळीही हे काम करू लागली. आता टेकडी स्वच्छ करणारी एक गँगच तयार झालीय. ओजसची ही गँग सध्या पुण्यातली वेताळ टेकडीवरचा कचरा गोळा करण्याचं काम करत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

कशी मिळाली प्रेरणा? बच्चे कंपनीमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या हॅरी पॉटर सीरिजपासून ओजसला ही प्रेरणा मिळाली आहे. ‘हॅरी पॉटर मधल्या डबल डोअर्स आर्मीकडून मी प्रेरणा घेऊन मी तीन वर्षांपूर्वी  मित्र-मैत्रिणींना एकत्र केलं. आम्ही सर्वांनी टेकडी स्वच्छतेचं काम सुरू केलं. सुरुवातीला आम्ही महिन्यातून एकदा मातोबा टेकडी स्वच्छ करत असू. पण, आमचे हे प्रयत्न अपूरे पडत होते. कारण काही कचरा तसाच शिल्लक राहत असे. त्यानंतर आम्ही महिन्यातून किती दिवस जायचं हे निश्चित केलं. दोन वर्ष आम्ही हे काम सुरू ठेवलं. त्यानंतर अखेर ऑगस्ट 2022 मध्ये मातोबा टेकडी स्वच्छ झाल्याचं आमच्या लक्षात आलं. त्यानंतर आता आम्ही वेताळ टेकडीवर लक्ष केंद्रीत केलं आहे.’ असं ओजसनं सांगितलं. पुणेकरांचा नाद खुळा! 10 किलो वजनाचं तयार केलं पैंजण, पाहा किती आहे किंमत, Video ‘टेकडीवरचा कचरा उचलला नाही तर पावसाच्या पाण्याबरोबर वाहून रस्त्यावर येतो. रस्त्यावरून गटारातून नदीत जातो नदीतून शेवटी समुद्रात आणि टेकडी साफ केल्याने या सर्व गोष्टी स्वच्छ राहतात. टेकडी स्वच्छतेच्या आमच्या आतापर्यंत 104  फेर्‍या पूर्ण झाल्या आहेत,’ अशी माहिती त्यानं दिली. ओजसने निसर्गाविषयी माहिती लोकांना व्हावी यासाठी सोशल मीडियावर ‘ओजस फोर सेवन’ हे पेज तयार केलंय. या पेजवर तो या स्वच्छता मोहिमेबद्दल माहिती देतो, तसंच इतरांनाही यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन करतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18 , Pune
  • First Published :
जाहिरात
जाहिरात