14 मे : ‘मी आता कायम स्वरुपी माझ्या आईसोबत राहणार याचा मला खूप आनंद आहे, ’ असं सुसाइड नोटमध्ये लिहित निर्माते अतुल तापकीर यांनी आज आत्महत्या केली. जागतिक मातृदिनाच्या दिवशी आणि अचानक घडलेल्या या दुःखद घटनेने मराठी फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. ते ‘ढोल ताशे’ सिनेमाचे निर्माते होते. अतुल तापकीर यांनी पुण्यातील प्रेसिडेंट हॉटेलमध्ये विष पिऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून कौटुंबिक वादातून त्यांनी ही आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. अतुल यांनी आत्महत्या करताना फेसबुकवर सुसाईड नोट पोस्ट केली होती. यामध्ये त्यांनी पत्नीकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे.
‘ढोल ताशे’ सिनेमामुळे त्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याचंही त्यांनी म्हटलंय. पोलीस तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.