Home /News /pune /

पिंपरी चिंचवड- सुनेच्या हत्येची सुपारी दिल्यानंतर घडलं उलटच, आरोपींनी सासऱ्यालाच संपवलं

पिंपरी चिंचवड- सुनेच्या हत्येची सुपारी दिल्यानंतर घडलं उलटच, आरोपींनी सासऱ्यालाच संपवलं

या प्रकरणी दोन आरोपींना म्हाळुंगे पोलिसांनी अटक केली असून इतर एकाचा शोध पोलीस घेत आहेत.

पिंपरी चिंचवड, 5 डिसेंबर : मुलाच्या दुसऱ्या पत्नीच्या खुनाचा कट रचणाऱ्या सासऱ्याचाच सुपारी दिलेल्या आरोपींनी खून केला असल्याची घटना समोर आली आहे. विनायक भिकाजी पानमंद असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी दोन आरोपींना म्हाळुंगे पोलिसांनी अटक केली असून इतर एकाचा शोध पोलीस घेत आहेत. ही घटना पुणे जिल्ह्यातील खेड येथे घडली आहे. अविनाश बबन राठोड आणि मोहम्मद शहजाद इस्लाम उर्फ छोटू अस अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर, मोहम्मद वसीम जब्बार हा फरार आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक यांचा मुलगा अजित याचा पहिला अधिकृत विवाह झाला असताना घरच्यांना माहीत होऊ न देता दोन वर्षांपूर्वी प्रेम विवाह केला होता. याची माहिती वडील विनायक यांना काही महिन्यांपूर्वी मिळाली होती. यातून वडील आणि मुलाचे नेहमी खटके उडायचे, भांडण होत असत. हे सर्व दुसरा विवाह केल्यामुळे होत असल्याचं विनायक यांना नेहमी वाटत होतं. तसेच मुलाचा पहिला संसार हा विस्कटल्याचं दुःख त्यांना होता. त्यामुळे त्यांनी मुलाच्या दुसऱ्या पत्नीचा खून करण्याचा कट रचला. त्यासाठी त्यांनी आरोपी अविनाश बबन राठोड, मोहम्मद शहजाद इस्लाम उर्फ छोटू आणि मोहम्मद वसीम जब्बार यांना टप्याटप्याने 1 लाख 34 हजारांची सुपारी दिली. आरोपींनी गोवा आणि उत्तर प्रदेश येथून दोन पिस्तुल आणून खुनाचा कट रचला. परंतु, महिलेचा खून करायचा असल्याने आरोपी हे घाबरले होते. त्यामुळे उशीर लागत होता. दरम्यान, मयत विनायक (सासरे) हे सुनेचा खून कधी करणार, होत नसेल तर पैसे परत करा असे म्हणून आरोपीकडे त्यांनी तगादा लावला होता. विनायक हे पैसे परत मागत असल्याने आरोपींनी त्यांना खेडमधील वराळे येथे बोलावून तिन्ही आरोपींनी गळा दाबून त्यांचा खून केला आहे. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड च्या म्हाळुंगे पोलिसांनी दोन आरोपींना पिस्तूलासह अटक केली असून इतर एकाचा शोध पोलीस घेत आहेत. 
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Pimpari chinchavad

पुढील बातम्या