जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / Pune Solapur Highway : गुळाची खेप घेऊन सख्खे भाऊ निघाले होते; हायवेवर घडलं भयानक, एकाचा गेला जीव

Pune Solapur Highway : गुळाची खेप घेऊन सख्खे भाऊ निघाले होते; हायवेवर घडलं भयानक, एकाचा गेला जीव

अपघाताचा व्हिडीओ

अपघाताचा व्हिडीओ

Pune Solapur Highway : पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. फोटो पाहून अपघाताची भीषणता लक्षात येऊ शकते.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

दौंड (पुणे), 27 जुलै : पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाही. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कुरकुंभ हद्दीत एका पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात पिकअप मधील दोन सख्ख्या भावांपैकी एकाचा मृत्यू तर दुसरा जखमी झाल्याची घटना घडली. सहजपूरमधून गूळ भरून ही पीकअप गाडी बार्शीकडे जात असताना कुरकुंभ हद्दीत हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की पिकअप वाहनाचे पाठीमागचे चाके तुटून पुढे आले आहेत. कसा घडला अपघात? बुधवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. राधेश्याम देवराव वानखेडे (वय 25, सध्या राण. लोणी काळभोर, मुळ रा. कमलापूर, ता. पूर्णा, जि. परभणी) असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तर अशोक देवराम वानखेडे (वय 35) असे जखमी भावाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, महिंद्रा पिकअप वाहन (एमएत 12 युएम 304) या वाहनामध्ये लोणी काळभोर येथून गुळाचा माल घेऊन बार्शीकडे जाण्यासाठी निघाले होते. पुणे-सोलापूर महामार्गावर पिकअपचा अपघात झाल्याने गाडी पलटी झाली. या घटनेत अशोक वानखेडे यांना किरकोळ दुखापत झाली. तर राधेश्याम वानखेडे यांना जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

जाहिरात

दोन दिवसांपूर्वी याच मार्गावर तिहेरी अपघात दोन दिवसांपूर्वी (25 जुलै) पुणे-सोलापूर महामार्गावरील खेडेकर मळा परिसरात आयशर टेम्पो, चारचाकी कार आणि दुचाकी यांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 2 गंभीर जखमी झाले असून 7 जण किरकोळ जखमी झाले आहेत. टेम्पोमध्ये बांधकामाच्या लोखंडी प्लेट होत्या. टेम्पो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि सोलापूरच्या बाजूने निघालेल्या चारचाकी गाडीवर जाऊन आदळला. तसेच बाजूने जाणाऱ्या एका दुचाकीलाही ठोकरले. अपघातग्रस्त व्यक्तींना कस्तुरी प्रतिष्ठान, लाईफ केअर रुग्णवाहिकेच्या मदतीने उरुळी कांचन येथील गणराज हॉस्पिटल, सिध्दीविनायक हॉस्पिटल, झेड प्लस हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वाचा - डमी ग्राहक पाठवल्याने स्पा सेंटरचं पितळ उघड; बीडमधून मुंबईतील 3 तरुणींची सुटका अपघात एवढा भीषण होता की, टेम्पो हा चारचाकी गाडीच्या बोनेटवर जाऊन थांबला. यावेळी गाडीत असलेल्या पती -पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांना किरकोळ जखम झाली आहे. तर टेम्पोतील दोघेजण गंभीर जखमी झाले असून दुचाकीवरील व्यक्ती जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात