मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

घाबरून या प्राण्याला मारू नका! भारतातील वटवाघुळं निपाह व्हायर पसरवत नाहीत; संशोधनातून नवी माहिती उघड

घाबरून या प्राण्याला मारू नका! भारतातील वटवाघुळं निपाह व्हायर पसरवत नाहीत; संशोधनातून नवी माहिती उघड

वटवाघळांमध्ये आढळणारा निपाह (Nipah virus) घातक असल्याचं सिद्ध झालं असलं तरी भारतातील वटवाघळांमधील निपाह व्हायरस घातक नसल्याचं संशोधनातून सिद्ध झालं आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण वटवाघळे मारू नयेत, असं आवाहन शास्त्रज्ञांनी केलं आहे.

पुढे वाचा ...

पुणे, 22 जून : वटवाघुळांमध्ये (Bats) असणाऱ्या निपाह व्हायरसमुळं (Nipah Virus in Mahabaleshwar caves ) सध्या सगळीकडं भीतीचं वातावरण आहे. मलेशियात (Malaysia) असणाऱ्या फलहारी वाटवाघुळांमध्ये आढळणारा हा व्हायरस धोकादायक (Dangerous Virus) असल्याचं यापूर्वी समोर आलं होतं. आता भारतातील वटवाघुळांमध्येदखील निपाह व्हायरस आढळून आल्यामुळं खळबळ उडालीय. मात्र भारतात आढळणाऱ्या वटवाघुळांमधला निपाह व्हायरस हा पूर्णतः वेगळा असून केवळ नाव एकसारखं असल्यामुळं (Namesake) त्याबाबत भीतीचं वातावरण तयार होतंय, अशी माहिती वटवाघूळ संशोधक डॉ. महेश गायकवाड यांनी दिली.

घाबरू नका, काळजी घ्या

वटवाघुळाच्या शरीरात अनेक जीवघेणे व्हायरस असतात. मात्र त्याचा मानवाशी संबंध येत नाही. त्यामुळे घाबरून न जाता काळजी घेणं गरजेचं असल्याचं संशोधक सांगतात. ज्या झाडावर वटवाघुळं असतील, त्या झाडावरून खाली पडलेली उष्टी फळं खाऊ नये, वटवाघुळांची शिकार करू नये, वटवाघुळांच्या अधिवासात घुसखोरी करू नये असे सल्ले या क्षेत्रातील संशोधक देत आहेत.

मानवासाठी ‘ही’ आहे धोक्याची घंटा

निसर्गात मानवाचा हस्तक्षेप जसजसा वाढत जाईल, तसतसे अनेक विषाणू आणि जिवाणू आपल्या शरीरात प्रवेश करत असल्याचं चित्र आहे.

...तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखता येईल; मोदी सरकारने सांगितला मार्ग

हवेत सर्वत्र असणारी बुरशीदेखील मानवासाठी घातक ठरत असून आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्याचं हे लक्षण मानलं जात आहे.

व्हायरस जुनाच, भीती मात्र नवी

२०२० मार्च मध्ये वटवाघुळाच्या दोन प्रजातींवर संशोधन करण्यात आलं होतं. त्यात निपाह व्हायरस सापडला होता. मात्र असे व्हायरस पूर्वीपासूनच वटवाघुळाच्या शरीरात आहेत. 2019 ला सुद्धा असंच संशोधन करण्यात आलं होतं. त्यात शास्त्रज्ञांना ‘बॅट कोरोना’ व्हायरस सापडला होता. याविषयीची माहिती समाजात वेगाने पसरली. मात्र हा व्हायरस कोरोना पसरवत नाही, हा मुख्य मात्र दुर्लक्षित राहिला आणि मोठा गैरसमज पसरले आणि लाखो वटवाघुळे मारली गेली.

हे वाचा - महाराष्ट्रासाठी चिंतेची बातमी, महाबळेश्वरमध्ये आढळला घातक निपाह व्हायरस!

पुन्हा तीच चूक नको

आतादेखील वटवाघुळांमधील निपाह व्हायरस मानवासाठी घातक असल्याचं सिद्ध झालंय. मात्र भारतातील वटवाघुळांमधील निपाह व्हायरस वेगळा असून त्याचा मानवी शरीरावर विपरित परिणाम होत नसल्याचं सिद्ध झालं आहे. त्यामुळं नागरिकांनी गैरसमजातून वटवाघुळे मारणं बंद करावं, असं आवाहन संशोधक करत आहेत.

First published:

Tags: Coronavirus, Covid-19, Mahabaleshwar, Research