जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / NIAची पुण्यात धडक कारवाई, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणीसह एकाला अटक

NIAची पुण्यात धडक कारवाई, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणीसह एकाला अटक

NIAची पुण्यात धडक कारवाई, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणीसह एकाला अटक

दोघांनाही अटक करून त्यांची चोकशी सुरू असल्याची माहिती अधीकाऱ्यांनी दिली आहे. या दोघांकडून आणखी धक्कादायक माहिती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे 12 जुलै: NIA अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि पुणे ATS ने संयुक्तरित्या ऑपरेशन राबवत दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या दोन संशयितांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये सईदा शेख या 21 वर्षीय तरुणीचा समावेश आहे तर नबील खत्री नामक 27 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. सईदा पुण्यातील येरवडा परिसरात राहत होती. पुण्यातील एका महाविद्यालयात तिने पत्रकारितेच शिक्षणही घेतल्याची माहिती समोर येत आहे. तर नबील  दिल्लीतील एका अति संवेदनशील प्रकरणात सहभागी असल्याचा संशय आहे. दिल्ली पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. दरम्यान, दोघांनाही अटक करून त्यांची चोकशी सुरू असल्याची माहिती अधीकाऱ्यांनी दिली आहे. या दोघांकडून आणखी धक्कादायक माहिती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इस्लामीक स्टेट खोरसान या ग्रुपशी हे तरुण संबंधित असल्याची माहितीही पुढे येत आहे. अतिरेक्यांच्या स्लिपर सेलमध्ये हे सहभागी असून त्यांना आर्थिक आणि तांत्रिक मदत मिळवून देणं. स्थानिक आश्रय देणं. पैसा पुरवणं आणि दहशतवादी संघटनांमध्ये नव्या तरुणांची भरती करणं अशी अनेक कामं हे तरुण करत असतात. NIA ने गुप्त माहितीच्या आधारे यांना अटक केली आहे. या दोघांचा अनेक कृत्यात सहभाग असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. NIA  आता या दोघांची कसून चौकशी करणार आहे. दिल्लीतल्या काही संवेदनशील प्रकरणात यांचा सहभाग असल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: pune ATS
  • First Published :
जाहिरात
जाहिरात