भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. दरम्यानं याठिकाणी विजांच्या कडकडाटासह वेगवान वारा वाहण्याची शक्यता आहे. तर उद्या भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना होण्याची शक्यता आहे.30 Jun, Almost NO severe weather warnings in Mah state coming 5 days by IMD today.Subdued rains in state for last 2 weeks,but was supported by daily TS🌩associated with mod rains🌧interior Situation likely to improve after first wk of July, as per model guidance. Pl chk IMD sites pic.twitter.com/i1itKM6vqf
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 30, 2021
हेही वाचा-चिंताजनक बातमी, देशात कोरोना रुग्णांमध्ये आढळला नवा धोका याशिवाय आज घाट परिसरातील पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर आणि कोकणात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वेगवान वाऱ्यासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर आज मुंबईतही कोरड्या हवामानाची नोंद झाली आहे. याठिकाणी काही भागात अंशत: ढगाळ वातावरण आहे. पण आज मुंबईत पावसाची शक्यता जवळपास नाही.30 Jun, Possibilities of mod thunderstorms🌩🌧 in Ghat areas of Maharashtra as seen from the latest satellite image at 1.20 pm.Nasik Pune Satara Kolhapur and parts of S Konkan too.🌩🌩 Mumbai sunny day with partly cloudy weather🌥 For updates please see IMD forecast. pic.twitter.com/n8bhUGLjoQ
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 30, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra, Monsoon, Weather forecast