ज्येष्ठ अभिनेते रामचंद्र धुमाळ काळाच्या पडद्याआड, पुण्यात घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ अभिनेते रामचंद्र धुमाळ काळाच्या पडद्याआड, पुण्यात घेतला अखेरचा श्वास

मराठी सिने सृष्टीतील सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते रामचंद्र धुमाळ यांचं आज पुण्यात निधन झालं.

  • Share this:

पुणे, 25 मे : मराठी सिने सृष्टीतील सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते रामचंद्र धुमाळ यांचं आज पुण्यात निधन झालं. ते 71 वर्षांचे होते. मागच्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिनेमांसोबतच त्यांनी वेब सीरिजमध्येही भूमिका साकारल्या होत्या. ‘सेक्रेड गेम्स’मध्ये त्यांनी भूमिका साकारली होती.

फॅण्ड्री, म्होरक्या, ख्वाडा, बोनसाय या सिनेमांत त्यांनी अभिनय केला होता. याशिवाय भाडिपाच्या डिजिटल कार्यक्रमातही अभिनय केला होता. अभिनेता सारंग साठेनं त्यांच्या निधनाची माहिती सोशल मीडियावरून दिली आहे.

सारंगनं रामचंद्र धुमाळ यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, 'RIP धुमाळ काका, तुम्ही आमच्या आठवणीत नेहमीच राहाल. माफ करा तुम्हाला गुडबाय करण्यासाठी आज आम्ही तुमच्यासोबत नव्हतो.' सारंगच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत रामचंद्र धुमाळ यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

First published: May 25, 2020, 11:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading