पुण्यातल्या रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये 30 नर्स क्वारंटाइन, एक नर्स आढळली पॉझिटिव्ह

पुण्यातल्या रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये 30 नर्स क्वारंटाइन, एक नर्स आढळली पॉझिटिव्ह

काही दिवसांपूर्वीच त्या सुट्टीहून परतल्या होत्या. त्यानंतर त्यांनी एका कोरोना रुग्णावर उपचारही केले होते.

  • Share this:

पुणे 12 एप्रिल : पुण्यातल्या रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये एक 45 वर्षांची नर्स कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या 30 नर्सना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. अशी माहिती हॉस्पिटलच्या मेडिकल सर्व्हिस विभागाचे संचालक संजय पाठारे यांनी दिलीय. काही दिवसांपूर्वीच त्या सुट्टीहून परतल्या होत्या. त्यानंतर त्यांनी एका कोरोना रुग्णावर उपचारही केले होते. त्यानंतर त्यांना सौम्य लक्षणे दिसायला लागली होती. त्यामुळे त्यांची टेस्ट करण्यात आली आणि ती पॉझिटिव्ह निघाली अशी माहितीही त्यांनी दिली.

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात तब्बल 134 रुग्णांची संख्या वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी 113 रुग्ण हे मुंबईतच आढळले आहे.

महाराष्ट्राला कोरोना व्हायरसने घातलेला विळखा वाढतच चालला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्याही 1895 वर पोहोचली आहे.  गेल्या 24 तासात मुंबई, पुणे, मीरा भाईंदर, नवी मुंबई, ठाणे आणि वसई विरारमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे.

हेही वाचा -लॉकडाऊनमध्ये दारू नाही मिळाली तर प्यायला सॅनिटायझर आणि...

कोरोनाचं व्हॉटस्पॉट बनलेल्या मुंबईत 113 रुग्ण आढळले आहे. वरळी, कोळीवाडा, धारावी आणि उपनगरात नवे रुग्ण आढळले आहे. वसई आणि विरारनंतर आता मीरा भाईंदरमध्येही रुग्णांची संख्या वाढली आहे. आज सकाळपर्यंत  मीरा भाईंदरमध्ये 7 नवे रुग्ण आढळले आहे.  तर पुण्यात 4 रुग्ण आढळून आले. नवी मुंबई, ठाणे महापालिका, वसई विरार इथं प्रतेकी 2 रूग्णांची वाढ झाली आहे.  तर रायगड, अमरावती, भिवंडीमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, देशभरात 24 तासांत 909 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं रिपोर्टमधून समोर आलं आहे. तर अद्यापही 2 हजार नागरिकांचे रिपोर्ट्स येणं बाकी आहे. धक्कादायक बाब म्हणजे, 24 तासांत कोरोनामुळे 34 तर आतापर्यंत 273 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत भारतात रुग्णांची संख्या 8,356 वर पोहोचली आहे. त्यापैकी 7,367 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 716 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामध्ये सर्वात लहान 6 वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश आहे.

First published: April 12, 2020, 5:09 PM IST

ताज्या बातम्या