पुणे, 25 जुलै : आरएसएसचे सरसहकार्यवाह मदनदास देवी यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, सरसंघचालक मोहन भागवत, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस, पालक मंञी चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे असे सगळेच मान्यवर मंडळी उपस्थित होती त्याआधी मोतीबागेतही अनेकांनी देवीजींचे अंत्यदर्शन घेतलं त्यामधे अगदी मुख्यमंञी एकनाथ शिंदे, उपमुख्यमंञी अजित पवार, माजी मंञी हर्षवर्धन पाटील यांच्यासारख्या इतर अनेक भाजपेतर नेत्यांचाही समावेश होता. मदनदास देवी यांचे सोमवारी वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले. बऱ्याच काळापासून ते आजारी होते. बंगळुरुतील राष्ट्रोत्थान रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. याशिवाय इतरही अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी संघटनमंत्री, राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे माजी सहसरकार्यवाह मदनदासजी देवी यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.. त्यांना नमस्कार केला त्याक्षणी मन खूप हळवे झाले. डोळे पाणावले. ज्या व्यक्तीमत्वाने संपूर्ण आयुष्य देशासाठी खर्ची घातले. राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरलेल्या अनेक पिढ्या ज्या संघटकाने उभ्या केल्या ; त्या संघटकाचे असे निश्चल असणे. मदनदासजी आपल्यात नाहीत हे मन मानायला तयार नाही अशा भावना महाराष्ट्राचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केल्या. कोण आहेत मदनदास देवी मदनदास देवी यांचं मुळ गांव सोलापूर जिल्ह्यातील करमाळा हे आहे. शालेय शिक्षणानंतर उच्च शिक्षणासाठी पुण्यातील BMCC कॉलेज येथे 1959 ला प्रवेश घेतला. M.Com नंतर ILS Law कॉलेज मध्ये गोल्ड मेडल पदकासह LLB चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर रँक मध्ये CA शिक्षण पूर्ण केले. पुण्यात शिक्षण घेत असताना वरिष्ठ बंधू खुशालदास देवी यांच्या प्रेरणेने संघ कार्यास सुरुवात केली. दैनंदिन शाखेतील स्वयंसेवक, संघाचे तत्कालीन पदाधिकारी प्रल्हादजी अभ्यंकर व अन्य अधिकारी वर्ग यांच्याशी वैचारिक चर्चा,संघ परीवारातील विविध आयामा विषयी विस्तारीत सल्ला मसलत करत असत. 1969 पासून संघ प्रचारक, विविध उत्तरदायित्वा- नंतर योजनेतून साधारणतः 1975 पासून अभाविप आयामात जबाबदारी मिळाली. पुढे अभाविपत विभाग, प्रदेश,क्षेत्रीय या जबाबदारी नंतर अ.भा. संघटन मंत्री.पूर्ण देशभरात तालुका- महाविद्यालय- शहर स्तरावर संस्कारित कार्यकर्ता समूह उभा राहील यासाठी विशेष लक्ष दिले. अभाविपला नावाप्रमाणे अखिल भारतीय स्तरावर नेण्यात पायाला भिंगरी लावल्यासारखं सतत प्रवास करीत देशभरात अनेक समर्पित कार्यकर्त्यांची फळी उभी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







