मराठी बातम्या /बातम्या /पुणे /कसबा पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट, बावनकुळेंची महाविकासआघाडीला वेगळीच ऑफर!

कसबा पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट, बावनकुळेंची महाविकासआघाडीला वेगळीच ऑफर!

कसबा पेठ पोटनिवडणुकीमध्ये वेगळाच ट्विस्ट आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकासआघाडी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना ऑपर दिली आहे.

कसबा पेठ पोटनिवडणुकीमध्ये वेगळाच ट्विस्ट आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकासआघाडी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना ऑपर दिली आहे.

कसबा पेठ पोटनिवडणुकीमध्ये वेगळाच ट्विस्ट आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकासआघाडी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना ऑपर दिली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 6 फेब्रुवारी : कसबा पेठ पोटनिवडणुकीमध्ये भाजपकडून हेमंत रासने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीमध्ये उमेदवारी दिली गेली नसल्यामुळे टिळक कुटुंब नाराज झालं. हेमंत रासने यांचा अर्ज भरायच्या वेळीही टिळक कुटुंबापैकी कोणी उपस्थित नव्हतं. यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे केसरी वाड्यात टिळक कुटुंबाच्या भेटीसाठी पोहोचले.

टिळक कुटुंबाची भेट घेतल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना वेगळीच ऑफर दिली आणि पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं. उद्या 3 वाजेपर्यंत महाविकासआघाडीने जर ही निवडणूक बिनविरोध केली तर आम्ही उद्या रासने यांचं तिकीट मागे घेऊ. निवडणूक लादू नये, एका वर्षासाठी लोकांना निवडणुकीला पाठवू नये, अशी नाना पटोलेंना विनंती आहे, असं बावनकुळे म्हणाले.

आमची कागदपत्र तयार आहे, फॉर्म तयार आहेत. टिळक परिवाराला आम्ही उमेदवारी द्यायला तयारत आहोत, पण महाविकासआघाडीकडून तसं येऊ दे. मागच्यावेळी पवार साहेब म्हणाले, सगळे इतर नेते म्हणाले, म्हणून आम्ही अंधेरी बिनविरोध केली, असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान तिकीट न मिळाल्यामुळे टिळक कुटुंब नाराज नसल्याचा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. 2 तारखेला शैलेश टिळक आणि कुणाल टिळक माझ्याकडे जी-20 साठी आले होते. टिळक कुटुंबिय कधीच नाराज होऊ शकत नाही. मुक्ताताई आमच्या नेत्या होत्या. लोक कल्लोळ करत आहेत, पण टिळक कुटुंब नाराज नाही, असं बावनकुळे म्हणाले.

आम्ही इकडे पहिल्यांदाच आलो नाही. त्यांच्या कुटुंबातील सदस्य विधानसभेत होत्या, शल्य वाटणारच ना. पक्षामध्ये कधीही जाणीवपूर्वक कोणाला डावलण्यात येत नाही. काही गोष्टींचं मेरिट असतं, कसबा आणि चिंचवडची परिस्थिती वेगळी आहे. कुणाल, बिडकर, घाटे सगळेच केपेबल होते, पण एका जागेवर एकच लढू शकतो, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

टिळक, घाटे, रासने, बिडकर असो 100 टक्के निवडून येतील. अनेक ठिकाणी ज्यांच्या घरी दिवंगत नेते गेले आहेत, त्यांना तिकीट दिलं नाही. कोणाचीही नाराजी नाही. काही लोक जाणीवपूर्वक बॅनरबाजी करत आहेत, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

First published:

Tags: BJP