जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / लय भारी, कारभारी! शेतकरी नवरा-बायकोला लागली पोलीस भरतीची लॅाटरी!

लय भारी, कारभारी! शेतकरी नवरा-बायकोला लागली पोलीस भरतीची लॅाटरी!

लय भारी, कारभारी! शेतकरी नवरा-बायकोला लागली पोलीस भरतीची लॅाटरी!

पोलिस दलात भरती झाल्याची आनंदाची बातमी कळताच नवऱ्याने बायकोला आपल्या सरप्राईज दिलं आहे. शेतात जाऊन चक्क उचलून घेत शेतातच केला आनंदोत्सव साजरा केलाय.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

रायचंद शिंदे (पुणे), 12 एप्रिल : आपल्याला शासकीय नोकरी लागल्याचे माहिती मिळताच आपला आनंद गगनात जातो. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. पोलिस दलात भरती झाल्याची आनंदाची बातमी कळताच नवऱ्याने बायकोला आपल्या सरप्राईज दिलं आहे. शेतात जाऊन चक्क उचलून घेत शेतातच केला आनंदोत्सव साजरा केलाय.

शेतात काम करत असताना पोलीस दलात भरती झाल्याची आनंदाची बातमी शेतकरी पुत्राला समजली. यानंतर ही माहिती मिळताच नवऱ्याने शेतात जाऊन चक्क आपल्या बायकोला उचलून घेत शेतातच आनंदोत्सव साजरा केला आहे.

जाहिरात
सर्वात मोठी बातमी! भारतात ‘या’ सेक्टरमध्ये निर्माण होणार तब्बल 1,50,000 जॉब्स; ग्रॅज्युएट्सना लागणार लॉटरी

पोलीस भरतीची अंतिम यादी प्रसिद्ध होत असताना शिरुर तालुक्यातील चांडोह येथील शेलार कुटुंबातील नवदाम्पत्य पती-पत्नीची एकाच ठिकाणी भरती झाले आहेत. नवदाम्पत्याचा आनंद गगणात मावेनासा झाल्याने शेतात काम करत असतानाच शेतात त्याने आपल्या बायकोला उचलुन घेऊन आनंदोत्सव साजरा केला.

RBI च्या संकल्पनेपासून मजुरांसाठी 8 तास ड्युटीपर्यंत; बाबासाहेबांबद्दल ‘या’ गोष्टी तुम्ही कधीच ऐकल्या नसतील

पोलीस भरतीच्या अंतिम यादीत नाव आले आणि पोलीस दलात कर्तव्यदक्ष पोलीस होण्यासाठी संधी मिळाली. हा पतीपत्नीचा आनंद म्हणजे पुन्हा लग्न होत असलेल्या आनंदा सारखाच असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. यांच्या आनंदाने त्यांच्या कुटुंबातील नातेवाईक सुखावले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात