मराठी बातम्या /बातम्या /पुणे /ना मिरवणूक ना गर्दी! पुणेकरांनो यंदा असा साजरा करा गणेशोत्सव, पोलिसांनी जाहीर केली आचारसंहिता

ना मिरवणूक ना गर्दी! पुणेकरांनो यंदा असा साजरा करा गणेशोत्सव, पोलिसांनी जाहीर केली आचारसंहिता

अनेक सोसायट्यांमध्येही गणपती बसविण्यात येणार आहे.

अनेक सोसायट्यांमध्येही गणपती बसविण्यात येणार आहे.

पुणे शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी स्पष्ट केले आहे.

पुणे, 18 ऑगस्ट : कोरोनाच्या संकटात यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन पोलीस, सरकार आणि नेते मंडळींनी दिला आहे. यासाठी पुणे पोलिसांनी गणेशोत्सव कसा साजरा करावा यासंबंधी एक आचारसंहिता जारी केली आहे. यामध्ये पोलिसांनी आगमन व विसर्जन मिरवणूक काढू नये, असे आवाहन जनतेला केले आहे.

पुणे शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीनं साजरा करण्यावर भर द्यावा, असे आवाहनी त्यांनी नागरिकांना केले आहे.

अशी आहे पोलिसांची आचारसंहिता

गणेश मूर्ती खरेदी

गणेश मूर्तीची खरेदी ऑनलाईन पद्धतीने करावी

यंदा स्टॉलला पदपथ, रस्त्यांवर परवानगी नाही

शाळांची पटांगणे, मोकळ्या जागांवर स्टॉलला परवानगी

श्री गणेश आगमनासाठी असणार असे नियम

आगमन व विसर्जन मिरवणूक काढू नये

आगमन व विसर्जनासाठी कमीत कमी नागरीकांची उपस्थिती असावी

श्री गणेश प्रतिष्ठापना करताना घ्या काळजी

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मंदिरातच करावी

अनन्यसाधारण परिस्थितीत मनपाच्या नियम व अटींचे पालन करुनच छोट्या मंडपांना परवानगी

सार्वजनिक मंडळांसाठी श्रींच्या मूर्तीची मूर्तीची उंची चार फुट व घरगुती गणपतीसाठी दोन फुट असावी

श्री गणेश पूजा करताना असतील असे नियम

आरती व पुजेसाठी 5 व्यक्तींचे बंधन, बाहेरील व्यक्तींचा सहभाग असू नये

सॅनिटायझर, मास्क व सोशल डिस्टंसींग अनिवार्य

गणेश दर्शन ऑनलाइनच!

दर्शनासाठी ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक आदी माध्यमांचा वापर करावा

ऑनलाईन व्यवस्था नसल्यास छोटे व्हिडीओ बनवून पाठवावेत

दर्शनासाठी ऑनलाईन टोकन, डिजीटल पास द्यावा व सामाजिक अंतराचे पालन करावे

कोणत्याही निमंत्रीत किंवा व्हिआयपी व्यक्तींना दर्शनासाठी आमंत्रीत करू नये

खासगी सुरक्षा रक्षक 24 तास हजार असावेत

संशयित किंवा बेवारस वस्तू आढळून आल्यास ताबडतोब पोलिसांना खबर द्यावी. मौल्यवान दागिने असणाऱ्या मंडळांनी संरक्षणाची विशेष काळजी घ्यावी. श्रीच्या मूर्तीचे रक्षणाकरीता कमीत कमी पाच कार्यकर्ते अथवा खासगी सुरक्षा रक्षक 24 तास हजार असावेत

First published:

Tags: Pune news