पुणे 23 मे: कोरोना विषाणूमुळे प्रत्येक घटकाला संकटाला समोरे जावे लागले आहे. याचाच फटका दुध उत्पादक शेतकऱ्यांनाही सहन करावा लागत आहे. कोरोना विषाणूच्या आधी प्रतिदिन १ लाख ७५ हजार लिटर दुध संकलन होत होतं. पण कोरोनाच्या काळात रोज सव्वा दोन लाख लिटर दुधाचे संकलन होत आहे. शिवाय लॉकडाऊन मुळे हॉटेल व्यावसाय, आईसक्रीम पार्लर, अमृततुल्य, मिठाई व्यवसाय बंद असल्याने पाहिजे तेवढं दुध विकलं जात नाही. त्यामुळे या दुधाचं आता काय करायचं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. आधी दूध उत्पादकाला दुधाला लिटर मागे ३१ रुपये दर मिळत होता तर कोरोनाच्या काळात हा दुधाचा दर कमी होऊन २५ रुपये मिळला. यामुळे महाराष्ट्रातील दुध उत्पादक शेतकर्यांना रोज १० ते ११ कोटीचा तोटा सहन करावा लागत असल्याची माहिती कात्रज डेअरीचे व्यवस्थापक विवेक क्षीरसागर यांनी दिली आहे. अनेक शेतकरी जोडधंदा म्हणून दुधाचं उत्पादन घेत असतात. त्यातून जो पैसा वाचतो तो शेतीसाठी लावला जातो. मात्र आता दुधाचे पैसेच येत नसल्याने पेरणीच्या काळात काय करायचं असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. दुधासोबतच इतर पिकांचाही प्रश्न निर्माण झला आहे. कारण लॉकडाऊनमुळे वाहतूक बंद आहे. भाजीपाला, फळे, न्यायचे तरी कोठे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे प्रचंड नुकसान त्यांना सहन करावं लागत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







