पुण्यात लॉकडाऊनच्या नियमांमध्ये नवे बदल, काय सुरू होणार...काय राहणार बंद? जाणून घ्या

पुण्यात लॉकडाऊनच्या नियमांमध्ये नवे बदल, काय सुरू होणार...काय राहणार बंद? जाणून घ्या

पुण्यातही बुधवारपासून काही नियम बदलले जाणार असून त्यासंबंधीचे नवे आदेश जारी करण्यात आले आहेत.

  • Share this:

पुणे, 2 जून : लॉकडाऊन 5 ला सुरुवात झाल्यानंतर आता विविध टप्प्यांमध्ये नियम बदलून आणखी शिथिलता आणण्यात येत आहे. पुण्यातही बुधवारपासून काही नियम बदलले जाणार असून त्यासंबंधीचे नवे आदेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये दुकानं कधी आणि कोणत्या भागातील उघडी असतील, तसंच प्रतिबंधित क्षेत्र अशा मुद्द्यांबाबत माहिती देण्यात आली आहे.

नवीन आदेशात 65 ऐवजी 66 प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आली आहेत. मात्र असं असलं तरीही अनेक वस्त्या कोरोनामुक्तही झाल्या आहेत. 3 जून अर्थात बुधवारपासून पुण्यात उद्याने पहाटे 5 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. महापालिका नवीन आदेशानुसार प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर सर्व दुकाने सुरू राहतील. 8 जूनपासून 10 टक्के मनुष्यबळासह खासगी कार्यालये उघडणार आहेत.

लॉकडाऊन 5 बाबत पुण्यात काय आहेत नवे आदेश?

- प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 यावेळेत सुरू राहतील

- पुण्यात हॉटेल,मॉल,सिनेमागृह,मंदिरे बंदच राहणार

- दुकाने वेळ 9 ते 5 सुरू राहणार

– तुळशीबाग,हॉंगकॉंग,मंडई लेन पी 1, पी 2 नुसार 5 जून पासून सुरू होणार (समोर समोरच्या रांगेतील )

- बांधकाम व्यवसाय सुरू राहणार

- पुण्यात सलून,ब्युटी पार्लर बंदच

पुण्यात काय आहे कोरोनाची स्थिती?

- दिवसभरात 266 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

- दिवसभरात 169 रुग्णांना डिस्चार्ज.

- पुण्यात सर्वाधिक 25 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू.

- 165 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 35 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

- पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 6795.

(डॉ. नायडू हॉस्पिटल आणि खासगी हॉस्पिटल-6258 आणि ससून 537 )

- पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2331.

- एकूण मृत्यू -345.

-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- 4119.

- आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 1543.

First Published: Jun 2, 2020 11:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading