नवी दिल्ली, 16 जुलै: देशात कोरोनाचं थैमान सुरू आहे. यामध्ये कोरोनादरम्यान आणि याशिवायही न्यूमोनियाचा त्रास होणार अनेक रुग्ण आहेत. या रुग्णांना दिलासा देणारी बातमी आहे. भारतात न्यूमोनियाचं वॅक्सीन विकसित कऱण्यात आलं असून त्याला बुधवारी DGCIची मंजुरी मिळाली आहे.
क्लिनिकल चाचणीचा पहिला, दुसरा आणि तिसरा टप्पा पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनीने यशस्वीरित्या पूर्ण केला असून त्याचा आढावा डीजीसीआयने घेतला आहे. त्यानंतर 'न्यूमोकोकल पॉलिसाकारिडे लस' ही लस बाजारात आणण्यासाठी कंपनीला परवानगी देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
या लसीचा उपयोग न्यूमोनियापासून बचाव करण्यासाठी करण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला डीसीजीआय कडून भारतात लसची पहिली, द्वितीय आणि तृतीय टप्प्यातील क्लिनिकल चाचण्या घेण्यास मान्यता मिळाली होती. चाचणीचे सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर कंपनीने ही लस बनवून विक्री करण्याची परवानगी मागितली.
Maharashtra Board HSC Result 2020 : बारावीचा निकाल इथे पाहू शकता.
औषधाची पहिली चाचणी 2013 मध्ये 34 वर्ष वयोगाटातील नागरिकांवर घेण्यात आली होती. दुसऱ्या चाचणीमध्ये 12 ते 5 वर्ष वयोगटातील मुलांचा समावेश करण्यात आला होता. तिसरी चाचणी 6 ते 8 आठवड्यांच्या बालकांवर करण्यात आली. ऑक्टोबर महिन्यात ही चाचणी पूर्ण झाली. सध्या भारतात न्यूमोनिया होणाऱ्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे. याशिवाय कोरोनाची लागण झालेल्यांनाही न्यूमोनिया होत असल्याचं लक्षात आल्यानं या लसीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. DGCI ने या लसीला 14 जुलैरोजी परवानगी दिली असून लवकरच बाजारात उपलब्ध होऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.