अजित पवारांसोबतच्या बैठकीलाही होते हजर महापौर मुरलीधर मोहोळ काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकीला हजर होते. आता महापौरांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. राज्यात याआधीत अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण राजकीय नेत्यांमध्ये राज्यात सर्वप्रथम राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली. काही दिवसांच्या उपचारानंतर जितेंद्र आव्हाड या संकटातून सुखरूप बाहेर पडले. त्यानंतर थोड्याच दिवसांमध्ये काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. अशोक चव्हाण हे उपचारासाठी नांदेडहून मुंबईत दाखल झाले. यशस्वी उपचारानंतर तेही पुन्हा सुखरूप घरी परतले. त्यानंतर कोणतीही लक्षणं न दिसणाऱ्या धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची बाधा झाली. सुदैवाने मुंबईतील एका रुग्णालयातील 11 दिवसांच्या उपचारानंतर धनंजय मुंडे यांनीही कोरोनावर मात केली. संपादन - अक्षय शितोळेथोडासा ताप आल्याने मी माझी #COVIDー19 टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) July 4, 2020
आपला,
मुरलीधर मोहोळ, महापौर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Pune news