Home /News /pune /

धक्कादायक! गज कापून येरवडा कारागृहातून 5 कैदी फरार

धक्कादायक! गज कापून येरवडा कारागृहातून 5 कैदी फरार

या प्रकरणी येरवडा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू

पुणे, 16 जुलै:  कोरोना आणि लॉकडाऊन असताना पुण्यातील येरवडा कारागृहातून 5 कैदी पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे कैदी गज कापून पळून गेल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. देवगण अजिनाथ चव्हाण, गणेश अजिनाथ चव्हाण, अक्षय कोंडक्या चव्हाण, अंजिक्य उत्तम कांबळे, सनी टायरन पिंटो अशी फरार झालेल्या कैद्यांची नाव आहेत. या प्रकरणी येरवडा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असून या फरार झालेल्या कैद्यांचा शोध सुरू आहे. हे कैदी गज कापून पळून गेले आहेत. त्यांच्याकडे गज कापण्यासाठी धारदार शस्र कुठून आलं आणि त्यांना कोणी मदत केली का यासंदर्भातही चौकशी केली जाणार आहे. Maharashtra Board HSC Result 2020 : बारावीचा निकाल इथे पाहू शकता.
येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास जात पडताळणी कार्यालयाच्या परिसरातील तात्पुरत्या कारागृहाच्या इमारतीमधील खोलीचे गज तोडून हे 5 कैदी फरार झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच तात्काळ वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
Published by:Kranti Kanetkar
First published:

Tags: Coronavirus, Coronavirus symptoms, Pune news

पुढील बातम्या