'बहीण आणि संजय काकडे माझ्या हत्येचा कट रचत आहेत', रक्षाबंधनादिवशीच मेहुण्याने केले गंभीर आरोप

'रक्षाबंधनाच्या दिवशी हे सांगावं लागणं दुर्दैवी आहे,' असं म्हणत संजय काकडे यांचे मेहुणे युवराज ढमाले यांनी खळबळ उडवून दिली आहे.

'रक्षाबंधनाच्या दिवशी हे सांगावं लागणं दुर्दैवी आहे,' असं म्हणत संजय काकडे यांचे मेहुणे युवराज ढमाले यांनी खळबळ उडवून दिली आहे.

  • Share this:
पुणे, 3 ऑगस्ट : भाजपचे माजी राज्यसभा खासदार संजय काकडे यांच्यावर त्यांच्या मेहुण्याने खळबळजनक आरोप केला आहे. 'संजय काकडे आणि माझी बहीण उषा काकडे हे माझ्या हत्येचा कट रचत आहेत. रक्षाबंधनाच्या दिवशी हे सांगावं लागणं दुर्दैवी आहे,' असं म्हणत संजय काकडे यांचे मेहुणे युवराज ढमाले यांनी खळबळ उडवून दिली आहे. 'देव माझ्या बहीणीला देव सुबुध्दी देवो. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी,' अशी मागणीदेखील युवराज ढमाले यांनी केली आहे. त्यामुळे कौटुंबिक वादामुळे संजय काकडे आता वादात सापडले आहेत. संजय काकडे यांच्याविरुद्ध मेहुण्याच्या तक्रीनंतर गुन्हाही दाखल झाला आहे. आता त्यांच्याच मेव्हण्याने म्हणजेच युवराज ढमाले यांनी संजय काकडेंवर घणाघाती आरोप करत त्यांना चांगलंच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. 'संजय काकडेंनी मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे, माझ्यापुढे तू मोठा झाला नाही पाहिजे. नाहीतर मी तूला मारूनच टाकेन,' अशी धमकी दिल्याचा आरोप संजय काकडेंवर ढमालेंनी केला आहे. '2018 मध्ये काकडेंनी मला धमकी दिली. मात्र मी दबावापोटी गुन्हा दाखल केला नाही. आता जिवाला खूपचं धोका आहे असं वाटू लागल्यानं मी 25 - 5 - 2020 ला तक्रार दाखल केली. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका दिवसात गुन्हा दाखल केला नाही,' असं स्पष्टीकरण दरम्यान, युवराज ढमाले यांनी तीन वर्षांनी हा गुन्हा का दाखल केला? असा प्रश्न विचारत संजय काकडे यांनी उलट या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली आहे. हा गुन्हा दाखल करण्यासाठी कुठल्या राजकीय व्यक्तींचे फोन आले होते. त्याचा खुलासा होईल असंही काकडे म्हणाले आहेत. या प्रकरणात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे सखोल चौकशीची मागणी करणार असल्याचंही संजय काकडे यांनी म्हटलं आहे.
Published by:Akshay Shitole
First published: