मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

भारत बंद : पुण्यात व्यापारी महासंघाने बदलला निर्णय, ही आहे नवी भूमिका

भारत बंद : पुण्यात व्यापारी महासंघाने बदलला निर्णय, ही आहे नवी भूमिका

कोरोना व्हायरसचा भारतात शिरकाव झाल्यानंतर हा व्हायरस अधिक वेगाने पसरू नये म्हणून अनेक गोष्टींवर निर्बंध आणण्यात आले.

कोरोना व्हायरसचा भारतात शिरकाव झाल्यानंतर हा व्हायरस अधिक वेगाने पसरू नये म्हणून अनेक गोष्टींवर निर्बंध आणण्यात आले.

किसान आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यातील व्यापारी भारत बंद मोर्चात सहभागी देखील होणार आहेत.

पुणे, 7 डिसेंबर : शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 8 डिसेंबर रोजी 'भारत बंद'ची हाक देण्यात आली आहे. कोरोना काळात व्यवसायाचं आधीच मोठं नुकसान झालेलं असल्याने दुकाने सुरू ठेवण्यात येतील, असं पुण्यात व्यापारी महासंघाने सांगितलं होतं. मात्र व्यापारी संघाने आता आपला निर्णय बदलला आहे. पुण्यातील सर्व दुकाने दु. 12:30 पर्यंत म्हणजेच भारत मोर्चा संपेपर्यंत बंद राहतील, अशी माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका यांनी दिली आहे. किसान आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यातील व्यापारी भारत बंद मोर्चात सहभागी देखील होणार आहेत. व्यापारी महासंघाने आधी काय म्हटलं होतं? शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यास पाठिंबा आहे, परंतु दुकाने बंद राहणार नाहीत, अशी भूमिका पुणे व्यापारी महासंघाने जाहीर केली होती. शेतकरी आंदोलनास पाठिंबा म्हणून विविध राजकीय पक्षांनी उद्या भारत बंद पुकारला आहे. शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांना पुणे व्यापारी महासंघाचा पाठिंबा आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगोदरच व्यवसायाचे अतोनात नुकसान झाले असल्याने दुकाने बंद न करण्याबाबत सभासदांचा सूर होता. मात्र आता पुन्हा या निर्णयात बदल करण्यात आला आहे. दरम्यान, केंद्र सरकारने आणलेले नवे कृषी कायदे अन्याय करणारे आहेत, असं म्हणत देशभरातील विविध राज्यात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. तसंच लाखो शेतकऱ्यांनी आपली मागणी शासनकर्त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी दिल्लीच्या दिशेने कूच केले आहे.
First published:

Tags: Farmer, Pune (City/Town/Village)

पुढील बातम्या