चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी
पुणे, 22 मे : पुण्यात जर तुम्ही म्डाडाच्या घरासाठी प्रयत्न करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. पुणे म्हाडाच्या 2023 सालच्या सोडतीत तब्बल 1300 लाभार्थी अपात्र असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. ही ऑनलाईन सोडत प्रक्रिया पूर्णपणे मानवी हस्तक्षेपाशिवाय पार पडल्याचा दावा संबंधित कंत्राटदार कंपनी आणि पुणे म्हाडाने केला होता. पण विजेते ठरलेल्या लाभार्थींपैकी अद्याप 1300 जण सोडतीसाठी लागणारी डॉक्युमेंट्स अजूनही म्हाडाला सादर करू शकली नसल्याचं माहिती अधिकारात समोर आलं आहे.
म्हाडात घोटाळा झाल्याचा आरोप
आवश्यक त्या कागदपत्रींची पूर्तता केल्याशिवाय संबंधित लाभार्थी विजेते कसे काय ठरले? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. कारण यावेळी म्हाडाने पहिल्यांदाच अर्जदारांकडून सर्व डाक्यूमेंट ऑनलाईन अपलोड करून घेतल्यानंतरच त्यांचा लॉटरीत समावेश केला होता. मग तरीही 5600 पैकी तब्बल 1300 लाभार्थी आवश्यक ती डाक्यूमेंट्स अपलोड केल्याविनाच सोडतीस पात्र आणि लागलीच विजेती कशी ठरलीत? असा प्रश्न उपस्थित झाल्यावाचून राहत नाही. याचाच दुसरा अर्थ असा निघतो की संबंधित कंत्राटदाराने सोडतीसाठी म्हाडाला पुरवलेलं ऑनसॉप्टवेअर हे फुलफ्रूफ नव्हतं, असाच निघतो. म्हणूनच या कंपनीला ब्लँकलिस्ट करावं, अशी मागणी शर्मिला येवले यांनी केली आहे. यासंदर्भात पुणे म्हाडाच्या अधिकाऱ्यांशी प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता एकही अधिकारी जागेवर आढळून आले नाहीत.
वाचा - Pune News : ऐकावं ते नवलच, चप्पल चोरली म्हणून पुण्यात 3 जणांविरोधात गुन्हा दाखल
तुम्ही एकावेळी किती घरांसाठी अर्ज करू शकता?
तुम्ही म्हाडासाठी अर्ज करत असाल तर तुम्ही वेगवेगळ्या गटांसाठी अर्ज करू शकता. याशिवाय तुम्ही वेगवेगळ्या शहरांसाठी आणि घरांसाठी अर्ज करू शकता. याशिवाय तुमच्याकडे मुंबईत म्हाडाचं घर आधीच असेल तर तुम्ही नागपूर आणि पुणे किंवा कोकण विभागासाठी देखील अर्ज करू शकता.
तर मिळणार नाही दुसरं घर
तुमच्याकडे जर आधीच म्हाडाचं घर असेल तर तुम्हाला दुसऱ्यांदा घर मिळणार नाही. याशिवाय पती-पत्नी हे म्हाडाच्या घराचे सहमालक असतात. त्यामुळे पतीच्या नावावर घर असेल आणि पत्नीने पुन्हा अर्ज केला तर तुम्हाला घर मिळू शकणार नाही. तुम्ही मुंबई आणि नागपूर दोन्ही ठिकाणी घरासाठी वेगवेगळा अर्ज केला असेल आणि दोन्ही ठिकाणी घर लागलं तर ते घेता येतं. तशी तुम्हाला कागदपत्रही सादर करावी लागतात. यंदा म्हाडा पूर्णपणे तंत्रज्ञानाचा आधार घेऊन लॉटरी काढली जाणार आहे. याशिवाय तुम्ही म्हाडाच्या अॅपवरूनही अर्ज करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mhada Lottery, Pune