पुणे, 21 मे : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी (19 मे) संध्याकाळी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याची घोषणा केली. याबरोबरच नागरिकांना 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. या निर्णयावर विरोधकांकडून टीका होत असताना भाजपचे मित्रपक्षाचे नेते सदाभाऊ खोत यांनी मात्र यावर अजब सल्ला दिला आहे.
काय म्हणाले सदाभाऊ खोत?
पहिल्या नोटबंदीत देशाच्या अर्थव्यवस्था उध्वस्त झाली. जनता बेकारी आणि महागाईने होरपळत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. अशा स्थितीत भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रयत संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी अजब सल्ला दिला आहे. ज्याप्रमाणे 2000 च्या नोटा चलनातून बाद केल्या त्याचप्रमाणे 500 आणि 100 च्या नोटा देखील चलनातून बाद कराव्यात, असा सल्ला सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.
2000 च्या नोटा मागे घेतल्यानंतर सदाभाऊ खोत यांचा अजब सल्ला#RBI #sadabhaukhot pic.twitter.com/EmGkLJpJjV
— News18Lokmat (@News18lokmat) May 21, 2023
2000 च्या नोटेचा उद्देश पूर्ण झाला : आरबीआय
आरबीआयने जारी केलेल्या निर्णयानुसार, 2000 रुपये मूल्याची नोट नोव्हेंबर 2016 मध्ये जारी करण्यात आली. त्या वेळी चलनात असलेल्या सर्व 500 रुपये आणि 1000 रुपयांच्या नोटा एका झटक्यात चलनातून रद्द करण्यात आल्या होत्या. त्यावेळी बाजारातील चलनाची मागणी पूर्ण करण्यासाठी 2000 रुपयांची नोट जारी करण्यात आली होती. इतर मूल्यांच्या नोटा बँकांमध्ये पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यानंतर हे उद्दिष्ट साध्य करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे 2018-19 मध्ये 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती.
2000 च्या नोटा कायमस्वरूपी बंद?
आरबीआयच्या प्रेस रिलीझमध्ये असेही म्हटले आहे की, सामान्य व्यवहारांसाठी दोन हजार रुपयांची नोट वापरली जात नसल्याची बाब समोर आली होती. आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. यावरून हे स्पष्ट झाले आहे की, आरबीआयकडून 2000 रुपयांची नोट बंद न करता ती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआयने या निर्णयाला 'क्लीन नोट पॉलिसी' असे म्हटले आहे. सध्या चलनात असलेल्या 2,000 रुपयांच्या नोटा कायदेशीर निविदाच राहतील, असे आरबीआयने म्हटले आहे. आरबीआयच्या बँकांना खात्यात नोट जमा करण्याची आणि 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची सुविधा सर्व बँकांमध्ये 30 सप्टेंबर 2023 पर्यंत उपलब्ध असेल असे सांगण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rbi latest news, Sadabhau khot