अॅसिड फेकायला एक सेकंद लागतो…पण त्यामुळे आयुष्य बरबाद होतं. अॅसिड फेकणार्या आरोपींची लग्न होतात. पण अॅसिड हल्ल्यात बचावलेल्या महिलांची लग्नच होत नाहीत,अॅसिडने जाळलेल्या महिलांचा चेहरा पाहून देखील अंगावर काटा येतो, या अॅसिडने जळालेल्या विद्रूप चेहर्यामध्ये दिसते ती समाजाची विकृती…ही विद्रूपता का पाहायची नाही… समाजाची विकृती का दाखवायची नाही.. हा समाजाचा आरसा आहे… म्हणून हे चेहरे पाहायलाच हवेत…अॅसिड हल्ल्यातील तरूणींची ही विदारक कहाणी…पाहा रिपोर्ताज जखमा अॅसिडच्या..
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.