जगात असे अनेक लोक आहेत जे भुतांवर विश्वास ठेवतात. एवढंच नाही तर भुताट ठिकाणं असतात असाही अनेकांचा समज आहे.
असंच एक ठिकाण ते म्हणजे झपाटलेले हॉटेल. या ठिकाणी भुत असून ते दरवाज्यावर पहारा देतं अशी मान्यता आहेत. हे नेमकं प्रकरण काय आहे याविषयी जाणून घेऊया.
कॅसल ब्रॉमविच हॉल 1557 ते 1585 दरम्यान बांधला गेला. हे जगातील सर्वात झपाटलेल्या हॉटेल्सपैकी एक असल्याचं सांगितलं जातं.
काही पैरानॉर्मल इन्वेस्टिगेटर्स या हॉटेलमध्ये रात्रभर थांबले. या हॉटेलमध्ये अनेक आत्मे राहत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
हॉटेलच्या दारात भुते पहारा देत असल्याचा त्यांचा दावा आहे. आत जाणाऱ्या लोकांना ते प्रश्न विचारतात. भुतांनी या लोकांना विचारले की त्यांचे मित्र आहेत का? हो म्हटल्यावरच आत जाण्याची परवानगी मिळाली.
पैरानॉर्मल इन्वेस्टिगेटर्स यांनी येथील घटनेचा व्हिडीओदेखील बनवला. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तो दरवाजाजवळ पोहोचला तेव्हा अचानक दरवाजा उघडला. ज्यामध्ये आवाज रेकॉर्ड केला गेला. आवाज आला की आम्ही मित्र आहोत का? या प्रश्नानंतर दरवाजा उघडताना दिसतो.