जगातील सर्वात मोठी ऑफिस बिल्डिंग म्हटलं की समोर येतं ते अमेरिकेतील पेंटागन. पण याबाबतीत आता भारताने अमेरिकेला मागे टाकलं आहे. भारतात महाराष्ट्राशेजारीच जगातील सर्वात मोठी ऑफिस बिल्डिंग आहे.
35 एकर परिसरात आयताकार असलेली ही इमारत 15 मजली आहे. यात एकूण 131 एलिवेटर्स आहेत. भारतीय आर्किटेक्चर फर्म मॉर्फोजेनेसिसने ही बिल्डिंग डिझाइन केली आहे. ही तयार होण्यासाठी तब्बल 4 वर्षे लागली. संपूर्ण प्रकल्पाची किंमत 32अब्ज रुपये आहे.
ही इमारत तयार होण्याआधी डायमंड कंपन्यांनी ऑफिस खरेदी केले आहेत. उद्घाटन झाल्यानंतर या बिल्डिंगमध्ये 65 हजारपेक्षा अधिक हिरा प्रोफेशनल्स एकत्र काम करतील. ज्यात पॉलिशर्स, कटर्स, व्यापारी यांचा समावेश असेल.
आता ही बिल्डिंग महाराष्ट्राशेजारी म्हणजे नेमकी आहे कुठे तर गुजरातच्या सुरतमध्ये. डायमंड सिटी सुरत जगाची डायमंड कॅपिटल म्हणूनही ओळखली जाते. डायमंडसाठी वन स्टॉप डेस्टिनेशन म्हणून ही बिल्डिंग तयार करण्यात आली आहे.
सूरत डायमंड बोर्स असं या इमारतीचं नाव आहे. एसबीडी म्हणजे सुरत डायमंड बोर्स एक नॉन प्रॉफिट एक्सजेंज आहे. नोव्हेंबर 2023 पर्यंत या बिल्डिंगचं उद्घाटन होणार आहे.