मांजर म्हटलं की छोटासा, क्युट असा प्राणी. ज्याला पाहताच त्याला हातात घ्यावंसं वाटतं. पण सध्या असं मांजर चर्चेत आलं आहे, ज्याला पाहूनच धडकी भरेल.
एक असं मांजर जे माणसाइतकं मोठं आहे. या मांजराचा आकार पाहूनच सर्वजण थक्क होत आहेत. चार-पाच वर्षांच्या मुलाइतकं हे मांजर आहे.
या मांजराचं नाव आहे केफीर. रशियातील युलिया या नावाच्या महिलेचं हे पाळलेलं मांजर. ज्याचं रंग पांढरा आहे.
हे मांजर शरीराने माणसासारखं मोठं आहेच. पण त्याचे शौकही माणसांसारखेच आहेत. हे मांजर चक्क गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसलेलंही दिसलं.
या मांजराचे फोटो पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटतं आहे. तुमची यावरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.