लहान मुलांनी बॅटरी गिळल्याची बरीच प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. बॅटरी पोटात जाणं खतरनाक. त्यामुळे जीवाला धोका निर्माण होतो. पण आता संशोधकांनी अशी बॅटरी तयार केली आहे, जी खाल्ली तरी कोणताच धोका नाही.(प्रतीकात्मक फोटो/सौजन्य - Canva)
इन्स्टीट्युटो इटालियनो दी टॅक्नॉलॉजिया म्हणजे इटालियन इन्स्टीट्युट ऑफ टॅक्नॉलॉजच्या संशोधकांनी ही खाता येईल अशी रिचार्जेबल बॅटरी तयार केली आहे. एडवान्स्ट मटेरिअल्स जर्नलमध्ये याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. (फोटो सौजन्य - IIT)
ही बॅटरी बनवण्यासाठी बदाम आणि फूड सप्लिमेंट्सचा वापर करण्यात आला आहे. या बॅटरीत दोन इलेक्ट्रोड्सच आहेत, जे बदामच्या राइबेफ्लेविन आणि फूड सप्लिमेंटमधील केवनसेटिनपासून बनले आहे. (फोटो सौजन्य - IIT)
इलेक्ट्रॉड्समध्ये मधाच्या पोळ्यावरील मेणाचा वापर करण्यात आला आहे. ज्याला पातळ अशा सोन्याच्या प्लेटमध्ये गुंडाळण्यात आलं आहे. (फोटो सौजन्य - IIT)
बॅटरी सेल 0.65 वोल्टवर चालते. हे वोल्टेज इतकं कमी आहे की मानवी शरीरात कोणत्याही समस्या निर्माण होणार नाहीत. (फोटो सौजन्य - IIT)
इलेक्ट्रिक करंटचं काम चारकोल करतं. तर शॉर्टसर्किटपासून वाचवण्यासाठी सेपरेटर म्हणून नोरी सिव्हिड हे समुद्री शेवाळ वापरण्यात आलं आहे. (फोटो सौजन्य - IIT)
पोटात जाऊन ही बॅटरी आपल्या खाण्याच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवेल. तसंच आजारांचं निदान आणि उपचारही होतील. अशा बॅटरींचा मुलांच्या खेळण्यात वापर होऊ शकतो. (फोटो सौजन्य - IIT)