लोकांना सेल्फी का आवडतात? कोणतंही चांगलं ठिकाण सापडलं नाही की फोन काढला आणि लगेच एक क्लिक. यामाहेही काही कारणे असून शास्त्रज्ञांनी याविषयी सांगितलं आहे.
जर्मनीच्या तुबिंगेन विद्यापीठ आणि ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी एक अभ्यास केला. जाणून घेण्याचा प्रयत्न केला लोक सेल्फीचे इतके वेडे का? टीमनं 2113 लोकांवर सहा प्रयोग केले आणि सेल्फीचा आपल्या मानसशास्त्राशी खोल संबंध असल्याचं आढळून आलं.
या अभ्यासात असे आढळून आले की आपल्याला जी प्रतिमा पहायची आहे तीच प्रतिमा आपल्याला जगाला दाखवायची आहे.
संशोधक लेखक Zachary Niese म्हणाले, सेल्फीसारखे वैयक्तिक फोटो लोकांना जुन्या आठवणींशी जोडण्यास मदत करतात. असे फोटो समोर येताच त्यावेळच्या सर्व आठवणी ताज्या होतात.
ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीच्या मानसशास्त्राच्या प्राध्यापिका लिसा लिबी म्हणाल्या, "या फोटोंसह, ती संपूर्ण घटना पुन्हा जगू लागतो." तेच वातावरण, तीच हवा, तीच माणसे... सर्व काही. हे आपल्या सर्वांना चांगली भावना देते.
दुसऱ्यांनी काढलेले फोटो लोकांना आवडत नाही. स्वतःला निवडक पद्धतीने इतरांसमोर मांडण्यासाठी लोक सेल्फी जास्त प्रमाणात काढतात.