आपल्यासोबत दिवसभरात घडणाऱ्या गोष्टींकडे आपण कधी लक्ष देतो का? आपल्यासोबत, शरीरासोबत घडणाऱ्या अनेक छोट्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो. मात्र त्याचा आपल्या शरीरावर नेमका काय परिणाम होतो याचा विचार करायला हवा. सर्वांच्याच अंगावर काटा येतो. मात्र हा नेमका कधी आणि का येतो याविषयी कधी विचार केलाय का? आज याविषयी जाणून घेऊया. प्रत्येकाला वेगवेगळ्या भावनांमध्ये अंगावर काटा येतो. कधी आनंद, दुःख, भिती, भावुक, अशा निरनिराळ्या वेळी लोकांच्या अंगावर काटा उभा राहतो. प्रत्येकाला वेगवेगळ्या भावनांमध्ये अंगावर काटा येतो. कधी आनंद, दुःख, भिती, भावुक, अशा निरनिराळ्या वेळी लोकांच्या अंगावर काटा उभा राहतो. आपले शरीर अनेकदा उत्तेजना आणि अस्वस्थतेच्या वेळी सैल झालेल्या स्नायूंना घट्ट करण्याचा प्रयत्न करते, ज्यामुळे अंगावर काटा उभा राहतो. अंगावर काटा येणे म्हणजेच गुसबंप येणं ही शरीराची सामान्य कृती आहे.