आपण आजारी पडलो की हॉस्पिटलची पायरी चढत असतो. किंवा काही गंभीर आजार झाला की हॉस्पिटलला जावंच लागतो.
तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की शस्त्रक्रियेपूर्वी कोणताही डॉक्टर हिरवा कपडा घातलेला दिसतो. यामागे नेमकं कारण काय? याचा कधी विचार केला आहे का.
याचं उत्तर Quora या मेगा वेबसाइटवर विकास मिश्रा नावाच्या व्यक्तीने दिली आहेत. विकासने सेंट फ्रान्सिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे.
विकास यांनी सांगितलं की, हिरवा आणि निळा रंग प्रकाशाच्या स्पेक्ट्रमवर लाल रंगाच्या विरुद्ध असतात आणि ऑपरेशन दरम्यान सर्जनचे लक्ष बहुतेक फक्त लाल रंगांवर केंद्रित असते.
कापडाचा हिरवा आणि निळा रंग केवळ सर्जनची पाहण्याची क्षमता वाढवत नाही तर त्याला लाल रंगासाठी अधिक संवेदनशील बनवतो.
सर्जिकल नर्सच्या 1998 च्या अंकातही एक अहवाल प्रसिद्ध झाला होता. त्यानुसार हिरवे कापड शस्त्रक्रियेदरम्यान डोळ्यांना विश्रांती देते. जगातील पहिले सर्जन मानले जाणारे सुश्रुत यांनी आयुर्वेदात शस्त्रक्रियेदरम्यान हिरव्या रंगाच्या वापराविषयी लिहिले आहे. पण यामागे कोणतेही विशिष्ट कारण नाही.

पूर्वीचे डॉक्टर आणि हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी पांढरे कपडे घालायचे. पण 1914 मध्ये डॉक्टरांनी ते बदलून हिरवे केले. तेव्हापासून हा ड्रेस कोड ट्रेंड बनला आहे. आजकाल काही डॉक्टरही निळे कपडे घालतात.