जसनीत कौर नावाच्या युवतीने बड्या बापाच्या मुलांना अश्लिल व्हिडीओ आणि फोटो पाठवत इंस्टाग्रामवर अडकवल्याने मोठी खळबळ उडाली आहे. जसनीत ही युवक काँग्रेसचे नेते लकी संधू यांच्या अगदी जवळची असल्याने पोलिसांनी संधूचेही नाव घेतले आहे.
जसनीतने वडिलांच्या निधनानंतर इंस्टाग्राम अकाउंट काढून प्रसिद्धीसाठी अश्लील फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत होती. याद्वारे ती श्रीमंत लोकांना टार्गेट करायची. त्यांना आपल्या मायाजालमध्ये अडकवून लाखो रुपयांना गंडा घालायची.
तीची कसून चौकशी केल्यानंतर काँग्रेस नेते लकी संधू यांचे नाव समोर आले आहे. संधूचे अनेक गुंडांशीही संबंध असल्याचे दिसून आले.
तीने एका व्यापाऱ्याला फसवून दोन कोटी रुपयांची मागणी करत ब्लॅकमेल केल्याची घटना घडली आहे. हा व्यापारी पोलिसांत गेल्यानंतर जसनीतने त्याला गुंडांकडून धमक्या दिली होती. पोलिसांनी तिला ओळखून जसनीतला मोहाली येथून अटक केली आहे.
जसनीत कौर इन्स्टावर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केल्यानंतर ती फॉलोअर्सची संपूर्ण प्रोफाइल तपासायची आणि त्यांना मेसेज करायची.