जगभरातील काही लोक विमानाने प्रवास करतात. काहीजण प्रवास नसले करत तरीही त्यांना विमानाच्या प्रवासाविषयी, नियमांविषयी माहिती असतं. विमानातील सर्वात सुरक्षित सीट कुठली? याविषयी तुम्हाला माहितीये का. नसेल तर याविषयी जाणून घेऊया. अमेरिकन दिग्गज मॅगझीन टाईमने याविषयी एक अहवास प्रकाशित केला होता की, विमानातील सुरक्षित सीट कोणती. अहवालानुसार, मध्यभागीच्या सीटवर अपघातात मृत्यू होण्याची संख्या कमी आहे. मधल्या सीटपासून मागे याभागातील सीट सुरक्षित मानली जाते. 1985 ते 2020 चे अपघात पाहता, मध्यभागीपासून मागचा भाग सुरक्षित आहे, असा दावा करण्यात आला आहे.